Sharad Pawar : ''संभाजी भिडे वगैरे प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची...'', पवार भडकले!

मुंबई तक

19 Aug 2024 (अपडेटेड: 19 Aug 2024, 11:00 PM)

Sharad Pawar On sabhaji bhide : संभाजी भिडे वगैरे प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची माणसे आहेत का? काहीही प्रश्न विचारता का? म्हणूनच मी तुम्हाला भेटायचे नाही असे म्हणत होतो. हल्ली कसेही प्रश्न विचारता.

sharad pawar criticize sabhaji bhide maratha reservation manoj jarange patil

शरद पवार यांनी सोमवारी सकाळी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार असतो.

point

त्यांच्या मनात नक्की काय सुरू आहे, मला माहित नाही

point

संभाजी भिडेंवर शरद पवार भडकले

Sharad Pawar On sabhaji bhide : मराठा आरक्षणावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. त्यात 'मराठ्यांनी आरक्षणाचा नाद सोडून उभा देश चालवण्यावर लक्ष केंद्रीत करावे', असा सल्ला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी मराठा समाजाला दिला आहे. भिडेंच्या याच विधानावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता पवार प्रचंड चिडले. 'संभाजी भिडे वगैरे प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची माणसे आहेत का?' असा प्रतिसवालच त्यांनी पत्रकारांना केला.  (sharad pawar criticize sabhaji bhide maratha reservation manoj jarange patil) 

हे वाचलं का?

शरद पवार यांनी सोमवारी सकाळी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की, संभाजी भिडे वगैरे प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची माणसे आहेत का? काहीही प्रश्न विचारता का? म्हणूनच मी तुम्हाला भेटायचे नाही असे म्हणत होतो. हल्ली कसेही प्रश्न विचारता. एकंदर आपल्या लोकांचा दर्जा फार उतरलेला आहे. संभाजी भिडे आणि अमुक- तमूक...., असे म्हणतच शरद पवार यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.

हे ही वाचा : Gautami Patil: गौतमी पाटीलला जामीन मंजूर, पण... का चढावी लागलेली कोर्टाची पायरी?

अजित पवार यांच्या बारामतीमधून निवडणूक न लढवण्याच्या मुद्यावरही पवारांनी प्रतिक्रिया दिली. ''सार्वजनिक किंवा राजकीय जिवनात निवडणूक लढलेल्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार असतो. त्यानुसार जिथे अनुकूल वातावरण असते, तिथे त्यानुसार निर्णय घेतले जातात. पण आता यांच्या (अजित पवार) मनात नक्की काय सुरू आहे हे मला माहिती नाही'', असे शरद पवार म्हणाले.

संभाजी भिडे काय म्हणाले? 

संभाजी भिडे यांनी रविवारी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत मराठा समाजाला आरक्षणाचा आग्रह न धरण्याचा सल्ला दिला होता. मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. आमच्या सांगवी गावात एक ट्रेनिंग कॅम्प आहे. त्यात वाघ- सिंहांनी प्रवेश मागावा का? एखाद्या ग्लायडिंग सेंटरमध्ये गरुडाने प्रवेश घ्यावा का? स्वीमिंग क्लबमध्ये माशाने प्रवेश मागावा का? मराठ्यांनी आरक्षण मागावे का? मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे. त्यामुळे त्यांनी आरक्षण कुठून काढलंय? असा सवाल त्यांनी याविषयी उपस्थित केला होता.

    follow whatsapp