Sharad Pawar: ‘जे महिलेनं सुनावलं ते…’, पवारांनी कोल्हापुरात जाऊन मुश्रीफांना डिवचलं!

रोहित गोळे

25 Aug 2023 (अपडेटेड: 25 Aug 2023, 04:54 PM)

Sharad Pawar Criticized to Hasan Mushrif: कोल्हापूरच्या सभेत शरद पवार यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. त्यांनी ईडीच्या नोटीसला घाबरून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं शरद पवार यावेळ म्हणाले.

sharad pawar criticized to hasan mushrif in kolhapur over he join with bjp government maharashtra politics latest

sharad pawar criticized to hasan mushrif in kolhapur over he join with bjp government maharashtra politics latest

follow google news

Sharad Pawar Criticized to Hasan Mushrif: कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (25 ऑगस्ट) कोल्हापूरमध्ये जाहीर सभा घेत मोदी सरकारवर तुफान टीका केली. मात्र, याचवेळी अजित पवार गटात गेलेल्या मंत्री हसन मुश्रीफांवर (Hasan Mushrif) अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली. त्यांच्या घरातील महिलेने जे ईडीच्या अधिकांऱ्यांना सुनावलं तसंही त्यांना बोलता आलं नाही.. अन् ते भाजपसोबत गेले. अशी टीका शरद पवार यांनी यावेळी केली आहे. (sharad pawar criticized to hasan mushrif in kolhapur over he join with bjp government maharashtra politics latest)

हे वाचलं का?

शरद पवारांनी कोल्हापुरात घेतला हसन मुश्रीफांचा खरपूस समाचार…

‘आज ही जी सत्ता आहे त्या सत्तेचा वापर हा विरोधी पक्षाच्या लोकांना त्रास कसा द्यायचा यासाठी वापरली जात आहे. अनिल देशमुख हे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. जे स्वच्छ भूमिका घेत होते. त्यांना आवार घालायचं म्हणून त्यांच्यावर खोटा खटला भरला. बारा-तेरा महिने राज्याचा गृहमंत्री तुरुंगात राहतो.. पण हा गृहमंत्री स्वाभिमानी माणूस होता. त्यांना सांगण्यात आलं की, तुमच्याकडे या, तुम्ही आमच्या गटात या.. तुम्ही आमच्या पक्षात या.. जर आला नाहीत तर तुमची जागा आत आहे..’

‘त्यांनी स्वच्छ सांगितलं.. माझी जागा तुरुंगात असो नाही तर आणखी कुठे असो.. मी सत्य हे सत्य म्हणणार.. मी तुमच्याशी तडजोड करणार नाही. ही गोष्ट सामनाचा संपादक राऊत.. ते लिहितात, टीका करतात.. त्यांनाही तुरुंगात टाकलं. त्यांना एकच सांगितलं तुम्ही हे बंद करा.. त्यांनी सांगितलं.. सत्य लिहिण्याचा अधिकार माझा आहे. तो मी बंद करणार नाही. त्यांनाही तुरुंगात टाकलं. नवाब मलिक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, प्रवक्ते ते सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या गोष्टीवर सातत्याने टीका-टिप्पणी करत होते. त्यांनाही तुरुंगात टाकलं. आता दोन महिन्यांसाठी त्यांना जामीन मिळाला आहे.’

‘अशा प्रकारच्या गोष्टी या प्रामाणिकपणाने समाजकारण करणाऱ्या लोकांच्या बाबतीत केल्या जात आहेत. त्याचा परिणाम त्यांना असं वाटलं.. की, आम्ही घाबरून जाऊ.’

‘एकदा निवडणुकीच्या मला ईडीची नोटीस आली. त्यांनी सांगितलं की, ईडीच्या ऑफिसमध्ये या. मी सांगितलं तुम्ही उद्या या म्हणतात.. मी आत्ताच येतो.. निघालो.. येतो जाहीर केल्यावर ईडीचे अधिकारी, पोलीस आयुक्त सर्व मुंबईला माझ्या घरी आले. म्हणाले हात जोडतो तुम्हाला.. तुम्ही काही येऊ नको..’

हे ही वाचा >> Sharad Pawar Kolhapur: मोदी सरकारमध्ये आया-बहिणींची इज्जत सांभाळण्याचीही… : पवार

‘ज्या कामासाठी मला ईडीची नोटीस दिली ते एका बँकेच्या व्यवहारासंबंधी होती. मी त्या बँकेचा सभासदही नव्हतो. त्या बँकेचं कधी कर्ज मी घेतलं नव्हतं. त्या बँकेत माझी ठेव नव्हती. काही नसताना एक प्रकारची भीती घालण्यासाठी ही ईडीची नोटीस मला दिली.’

‘आज तसं धाडस लोकांनी दाखवलं पाहिजे. ज्याची भूमिका सत्याची असेल त्याला चिंता करायचं कारण नाही.. त्यामुळेच अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत ही लोकं घाबरली नाहीत.’

‘आता आपण पाहिलं की, ईडीच्या नोटीशींचा दम काही नेत्यांना दिला. काही लोकांनी तोंड दिलं.. काही नेत्यांनी भूमिका बदलली. कोल्हापूर ही शूरांची नगरी आहे. इथे शौर्याचा इतिहास आहे. त्यामुळे तिथे अशी ईडीची नोटीस आली तर सामोरं जायचं ताकद दाखवतील अशी कल्पना माझ्यासारख्याची होती.’

हे ही वाचा >> Rohit Pawar : “राष्ट्रवादी फुटली नाही”, रोहित पवारांनी सरळ कारणच सांगितलं…

‘पण इथे काही वेगळंच घडलं. कोल्हापुरात कोणाला तरी नोटीस आली.. आली ना नोटीस?, कोणाच्या तरी घरी सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्सची टीम गेली. मला असं वाटलं की, एकेकाळी आम्हा लोकांसोबत काम केलेले लोक काही तरी स्वाभिमान असेल..’

‘घरातील महिलांनी सांगितलं.. ज्या प्रकारे तुम्ही आमच्यावर टीका करता, हल्ले करताय.. याच्यापेक्षा तुम्ही आम्हाला गोळ्या घाला.. त्याला आमची तयारी आहे. असं एक भगिनी म्हणू शकते पण त्या कुटुंबाचा जो प्रमुख आहे त्याने असं म्हटलेलं काही मी ऐकलं नाही. त्याने एकंदर एकच गोष्ट केली की, जे भगिनीने धाडस दाखवलं ते धाडस दाखवायच्या आधी आपण ईडीच्या दरबारात जाऊन बसू भाजपमध्ये जाऊ, ते म्हणतील तिथे बसू.. आणि यातून आपली सुटका करू अशी भूमिका त्यांनी घेतली.’ अशा शब्दात शरद पवार यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना सुनावलं आहे.

    follow whatsapp