Sharad Pawar Family Come Together Shrinivas Pawar Home : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पुन्हा एकदा पवार कुटुंबिय एकत्र आले आहे. यावेळेस निमित्त दिवाळीचं होतं. दिवाळी सणानिमित्त पवार कुटुंबिय एकत्र आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे बंधू श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांच्या निवासस्थानी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले आहे. या सर्व भेटीचे फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (sharad pawar family come together second time shrinivas pawar govind bag padwa celebratiom ajit pawar)
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गेल्याच आठवड्यात भेट झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले होते. शरद पवार यांचे बंधु प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी ही भेट घडून आली होती. या भेटीनंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले आहे. कन्हेरी येथील अनंत तारा बंगल्यावर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
हे ही वाचा : Gajanan Kirtikar : ‘…म्हणून रामदास कदम शिवसेनेत राहिले’, अनिल परबांचा खळबळजनक गौप्यस्फोट
दरवर्षी पवार कुटुंबिय एकत्र येतात. त्यातूनच आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्रीनिवास पवार यांच्या घरी देखील आयोजित कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार हे जेवणासाठी एकत्र येणार असल्याची चर्चा होती. तर याआधी प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घडून आली होती. आता खासदार सुप्रिया सुळे यांनी आजच्या स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत सर्व पवार कुटुंबिय शरद पवार यांच्यासोबत दिवाळीचं सेलिब्रेशन करताना दिसत आहे. मात्र या फोटोत अजित पवार कुठेच दिसत नाही आहे. पण त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार दिसत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार कुटुंबिय पुन्हा एकदा एकत्र आल्याची चर्चा आहे.
गोविंद बागेत पाडव्याची जय्यत तयारी
दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने उद्या पवार कुटूंबीयांची भेट घेण्यासाठी राज्यभरातले असंख्य कार्यकर्ते येत असतात. शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या गोविंद बागेत सध्या पाडव्याची तयारी करण्यात आली आहे. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे,आमदार रोहित पवार यांच्यासह पवार परिवारातील सर्व सदस्य कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत असतात.राज्यातील जनतेसाठी आणि राजकीय नेत्यांसाठी मात्र यंदाचा पाडवा विशेष आहे. कारण राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ADVERTISEMENT