Sharad Pawar Massajog Beed : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर राज्याच्या विधानसभा अधिवेशनातही हा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यानंतर आता शरद पवार यांनी आज मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीमध्ये शरद पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं आणि संतोष देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे.
ADVERTISEMENT
शरद पवार म्हणाले, बजरंग सोनवणे यांनी संतोष देशमुखच्या हत्येचा मुद्दा लावून धरला. संसदेत ते बोलत राहिले. राज्याच्या विधानसभेत संदीप क्षीरसागर आणि जितेंद्र आव्हाड यांनी हा मुद्दा मांडला. जातीचा विचार न करता त्यांनी हा मुद्दा मांडला. अन्याय मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी हा मुद्दा मांडला असं पवार म्हणाले.
हे ही वाचा >> Beed Crime News : बीडमध्ये चाललंय तरी काय? अजित पवार NCP च्या माजी नगरसेविकेच्या पुत्रानं कर्मचाऱ्याला मारलं
बीड जिल्ह्याचा महाराष्ट्रात लौकिक आहे. महाराष्ट्राचा साखर उद्योगाला हातभार लावणारा जिल्हा हा जिल्हा आहे. आज या जिल्ह्यात जे घडलं ते कोणालाही न पटणारं आहे. संतोषचा यात काहीच संबंध नसताना हे घडलं. या प्रकरणाची दखल राज्य आणि केंद्र सरकारने घ्यावी. आमच्या सहकाऱ्यांनी यात न्याय मिळावा म्हणून लोकसभेत आवाज उठवला. बीडमध्ये आज दहशतीचं वातावरण आहे, पण त्यातून बाहेर पडा. हत्या करणारे आरोपी आणि सूत्रधार यांना शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणीही शरद पवार यांनी केली. राज्य सरकार आणि केंद्र सरकार या प्रकरणाच्या खोलात जाणार नाही तोवर आम्ही स्वस्थ बसणार नाही असं शरद पवार म्हणाले.
हे ही वाचा >> Santosh Deshmukh Murder Case: "वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं...", जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने खळबळ
दरम्यान, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जावं, आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी शरद पवार यांच्यासमोर देशमुख यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. तर वाल्मिक कराड हेच यटा प्रकरणाचे मास्टरमाईंड असून, त्यांना तातडीनं अटक करा अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी शरद पवार यांच्यासमोर केली आहे.
ADVERTISEMENT