शरद पवारांनी राष्ट्रवादीत भाकरी फिरवणार असल्याचं जाहीर केलं. आणि स्वतःच राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. शेवटी राजीनामानाट्यानंतर पवारांनी माघार घेतली. आता पवारांनी भाकरी फिरवायला सुरवात केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत भाकर करपण्यापूर्वीच फिरवण्यासाठी एक खास स्ट्रॅटेजी ठरवण्यात आलीय.
आणि त्यासाठी कारभारीही नेमण्यात आलेय. पवारांची ही स्ट्रॅटेजी काय, भाकरी फिरवण्याची जबाबदारी कोणाकोणावर देण्यात आलीय आणि कोणाचा पत्ता कट होणार आहे?
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या नेतृत्वात बुधवारी कोअर कमिटीची बैठक झाली. याच बैठकीत पवारांनी भाकरी करपण्याआधीच कशी फिरवायची याबद्दलचा प्लॅन सांगितला. स्वतः प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्लॅनची माहिती दिली.
काय आहे पवारांचा भाकरी फिरवण्याचा प्लॅन?
भाकरी एकाच जागेवर असेल तर ती करपते. आणि करपू द्यायची नसेल, तर ती फिरवावी लागते. हेच सूत्र लावून वर्षांनूवर्षे एकाच ठिकाणावर असलेल्या पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन वर्षांपेक्षा अधिक काळ जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांना हटवण्यात येणार आहे. या प्लॅनची अंमलबजावणी करण्यासाठी विभागवार शिबिरं घेण्यात येणार आहेत. यानंतर प्रदेश पातळीवर बदल केले जाणार आहेत. बूथ कमिट्या बळकट करण्यासाठी पक्षाच्या काही लोकांवर जबाबदारी देण्यात आली आहे.
हेही वाचा >> Abhijeet Patil : शरद पवारांनी पंढरपुरात ‘भाकरी’ फिरवली, ‘मविआ’चा उमेदवार ठरला!
गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते, त्या जागांवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश पवारांनी दिलेत. यासाठी प्रत्येक नेत्यावर विभागवार जबाबदारी देण्यात आलीय. कोणाला काय जबाबदारी मिळालीय, ते आता आपण बघू. (कंसात विभाग)
1) अनिल देशमुख व मनोहर चंद्रिकापुरे (नागपूर)
2) राजेंद्र शिंगणे व अमोल मिटकरी (अमरावती)
3) जितेंद्र आव्हाड व सुनिल भुसारा (कोकण)
4) धनंजय मुंडे, विक्रम काळे, सतिश चव्हाण (मराठवाडा)
5) शशिकांत शिंदे व अरुण लाड (पश्चिम महाराष्ट्र)
6) सुनिल शेळके व चेतन तुपे (पुणे)
7) अशोक पवार व चेतन तुपे (सोलापूर)
8) अनिल पाटील व एकनाथ खडसे (खान्देश)
9) अनिकेत तटकरे व शेखर निकम (कोकण)
हेही वाचा >> संजय पवार यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी, ‘ती’ जाहिरातबाजी भोवली
यासोबतच पक्षांतर्गत निवडणुकीचा कार्यक्रमही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी पक्षांतर्गत राज्य निवडणूक अधिकारी म्हणून जयप्रकाश दांडेगावकर तसंच मुंबई विभागीय निवडणूक अधिकारी म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी निवड करण्यात आली. यावेळी बूथ किती कालमर्यादेत पूर्ण करावे याचे मार्गदर्शन पक्षश्रेष्ठींकडून करण्यात आले. कोअर कमिटीच्या बैठकीत पवारांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या महाविकास आघाडी म्हणूनच लढायच्या आहेत, असंही स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT