Supriya sule 45 thousand shares of Adani companies:अमेरिकेची आर्थिक संशोधन कंपनी हिंडेनबर्गने उद्योगपती गौतम अदाणींवर (Gautam Adani) सामाजिक फेरफार आणि अकाऊंटींग फ्रॉड केल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर देशभरात कॉंग्रेस चांगलीच आक्रमक झाली होती. अदाणींच्या कथित शेल कंपन्यांत 20 हजार कोटी रूपये कुणाचे आहेत? असा सवाल राहुल गांधींनी (Rahul Gandhi) करत संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापना करून चौकशीची मागणी केली होती. कॉंग्रेसच्या या मागणीनंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) जेपीसीच्या आवश्यकता नसल्याचे विधान करून राहुल गांधी यांना विरोध दर्शवला होता. या विरोधानंतर आता मोठी अपडेट समोर आली आहे. शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याकडे अदाणी कंपन्यांचे तब्बल 26 हजार 120 शेअर्स असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पवारांचे जावई सदानंद सुळे यांच्याकडे देखील अदाणी समूहाच्या कंपनींचे तब्बल 18 हजार 977 शेअर्स आहेत. म्हणजेच सुळे दाम्पत्याकडे अदाणी समूहाच्या कंपनीचे एकूण 45 हजार शेअर्स असल्याचं समोर आलं आहे. आता याच शेअर्सची किंमत किती आहे? आणि हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर या शेअर्सना किती फटका बसलाय, हे जाणून घेऊयात. (sharad pawar’s daughter supriya sule and son in law sadanand sule as many as 26 thousand shares of Adani companies)
ADVERTISEMENT
सुप्रिया आणि सदानंद सुळेंचे अदाणींच्या कंपन्यात शेअर्स
शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याकडे अदाणींच्या सहा कंपन्यांमध्ये 26 हजार शेअर्स आहेत. 2014 मध्ये सुप्रिया आणि सदानंद सुळे यांच्याकडे अदाणी समूहातील तीन कंपन्यांचे 21 हजार शेअर्स होते. त्यावेळी त्यांची किंमत 31 लाख 85 हजार 165 रूपये इतकी होती. त्यानंतर 2019 पर्यंत त्यांनी अजून 3 कंपन्यांचे शेअर्स खरेदी केल्याने सुळे दाम्पत्याची अदाणी समूहातील शेअर्सची संख्या 45 हजारापर्यंत जाऊन पोहचली.
हे ही वाचा : ‘बाळासाहेबांचे विचार पायदळी…’,PM मोदीच्या एकेरी उल्लेखानंतर CM शिंदे ठाकरेंवर बरसले!
हिंडेनबर्ग रिपोर्टचा फटका बसला?
सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी 2019 मधील लोकसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रात अदानी कंपनीच्या आपल्या कुटुंबाकडे असलेल्या शेअर्सचा तपशील दिला होता. दरम्यान, हिंडनेबर्ग अहवाल जाहीर होण्यापूर्वी या 45 हजार शेअर्सचे बाजारमूल्य 11 कोटी 68 लाख रूपये एवढे होते. मात्र, आता सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांच्याकडे हे 45 हजार शेअर्स अद्यापही आहेत की नाही याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. जर सुप्रिया सुळे यांच्याकडे हे शेअर्स आजही असतील तर त्यांच्या 45 शेअर्सचं मूल्य हे केवळ 2 कोटी 84 लाख एवढं झालं असेल. कारण हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर त्यांना देखील मोठा फटका बसलेला असू शकतो.
हे ही वाचा : भाजप प्रवेशाची चर्चा…बावनकुळेंसोबतच्या भेटीनंतर आशिष देशमुख काय म्हणाले?
शरद पवार मुलाखतीत काय म्हणालेले?
शरद पवार यांनी 7 एप्रिलला अदाणी समूहाच्या एनडीटीवीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत ते म्हणाले होते की, पूर्वी सरकारकडून टीका करण्यासाठी टाटा-बिर्ला समूहावर आरोप केले जायचे. पण नंतर लोकांना कळलं की या दोघांनी देशासाठी मोठं योगदान दिले आहे. मात्र आताच्या काळात अदानी-अंबानींना लक्ष्य केले जाते. पण अंबानींनी पेट्रोकेमिकल आणि इतर क्षेत्रात भऱीव योगदान दिले होते, तर अदानींना वीजसह इतर क्षेत्रात मोठं योगदान दिले होते. देशाला त्यांची गरज आहे. जर या समुहाने काही चुकीचे किंवा बेकायदा केले असेत तर त्या संदर्भात पुरावे सादर करण्याचे अधिकार लोकशाहीत असल्याचे शरद पवारांनी म्हटले होते. तसेच पवारांनी जेपीसीची मागणी व्यवहार्य नसल्याचा दावा केला होता. या विधानानंतर पवारांनी विरोधकांच्या मागणीतली हवाच काढून घेतल्याचं म्हटलं गेलं.
ADVERTISEMENT