Shashi Tharoor Criticize Nitish kumar, What is a ‘snollygoster’ ? : बिहारमध्ये इंडिया आघाडीला धक्का देत मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीश कूमार (Nitish kumar) एनडीएमध्ये सामील झाले आहेत. यानंतर इंडिया आघाडीतील नेत्यांनी नितीश कूमारांवर जोरदार टीका केली. कोणी त्यांना ‘आयाराम गयाराम’ म्हटले, तर कोणी ‘पलटूराम’ म्हटलं आहे. या सर्वांमध्ये सर्वांधिक चर्चा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी केलेल्या टीकेची झाली. कारण थरूरांनी नितीश कुमारांसाठी ‘स्नॉलीगोस्टर’ (snollygoster) या शब्दाचा वापर केला आहे. त्यामुळे या शब्दाचा अर्थ काय आहे? आणि शशी थरुरांनी नेमकी काय टीका केली आहे. हे जाणून घेऊयात. (shashi tharoor criticize nitish kumar using english prowess snollygoster what was meaning of word bihar political crisis )
ADVERTISEMENT
शशी थरूर यांची पोस्ट
शशी थरूर यांनी त्यांची 2017 सालची जुनी पोस्ट शेअर केली आहे. त्यावेळी नितीश कुमार राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या युती सरकारमधून बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपसोबत हातमिळवणी करत ते एनडीएत सामील झाले होते. त्यावेळी नितीश कुमारांच्या भूमिकेवर टीका करताना शशी थरूर यांनी ‘स्नोलीगोस्टर’ या शब्दाचा वापर केला होता.
हे ही वाचा : NCP Mla Disqualification : नार्वेकरांची सुप्रीम कोर्टात धाव! निकाल लांबणार?
‘स्नोलीगोस्टर’ म्हणजे काय?
शशी थरूरांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले होते की, आजचा शब्द, स्नोलीगोस्टर…अमेरिकेत ‘स्नोलीगोस्टर’ म्हणजे ‘धूर्त, तत्त्वहीन राजकीय नेता’ असे म्हटलं जाते. या शब्दाचा पहिल्यांदा वापर 1845 मध्ये झाला होता. त्यानंतर अलिकडेच या शब्दाचा वापर 26/7/2017 रोजी झाला होता.
शशी थरूरांनी त्यांच्या याच पोस्टला पुन्हा शेअर करत नितीश कुमारांवर निशाना साधला होता. यावेळी थरूरांनी एक्स प्लॅटफॉर्म लिहले की, आणखी एक दिवस या शब्दाचा वापर करावा लागेल, असे कधीच वाटले नव्हते…स्नोलीगोस्टर. दरम्यान शशी थरूर हे कठीण इंग्रजी शब्दांना सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी याआधी देखील स्नोलीगोस्टर शब्दाचा वापर केला होता.
हे ही वाचा : Chhagan Bhujbal नी शिंदे सरकारविरोधात थोपटले दंड! ओबीसींना हाक, केली मोठी घोषणा
दरम्यान 2017 मध्ये नितीश कुमार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर शशी थरूर यांनी या शब्दाचा उपयोग केला होता. तसेच 2019 साली देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी चर्चेत आला होता. महाराष्ट्राच्या या राजकीय घडामोडीवर टीका करण्यासाठी त्यांनी या शब्दाचा वापर केला होता. तसेच नोव्हेंबर 2022 मध्ये देखील सरड्याचा व्हिडिओ पोस्ट करून पक्ष बदलणाऱ्या राजकीय नेत्यांवर स्नोलीगोस्टर शब्दाचा वापर करून निशाणा साधला होता.
ADVERTISEMENT