Chahatrapati Shivaji Maharaj: शिंदे सरकार की Navy... शिवाजी महाराजांचा पुतळा कोणी उभारलेला? 'ते' पत्र समोर आलं अन्...

मुंबई तक

• 10:00 PM • 26 Aug 2024

सिंधुदुर्ग येथील शिवाजी महाराजांचा पुतळा नेमका कोणी उभारला होता याबाबत आता नेमकी माहिती आणि एक पत्र समोर आलं आहे. जाणून घ्या त्याविषयी.

शिवाजी महाराजांचा पुतळा कोणी उभारलेला?

शिवाजी महाराजांचा पुतळा कोणी उभारलेला?

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिवाजी महाराजांच्या 'त्या' पुतळ्यावरून आरोप-प्रत्यारोप

point

सार्वजनिक बांधकाम विभागाने 6 दिवसांपूर्वीच पुतळ्याच्या दुरुस्तीसाठी पाठवलेलं पत्र

point

शिवाजी महाराजांचा पुतळा हा नौदलाने उभारला होता

Shivaji Maharaj at Sindhudurg Navy: मुंबई: सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा साधारण 9 महिन्यांपूर्वी उभारण्यात आला होता. जो आज (26 ऑगस्ट) सकाळच्या सुमारास अचानक कोसळला. दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर आरोप-प्रत्यारोप देखील सुरू झाले आहेत. हा पुतळा नेमका कोणी उभारला होता? यावरून बरेच आरोप झाले. विरोधकांनी या मुद्द्यावरून शिंदे सरकारला बरंच घेरलं आहे. (shinde government or navy who erected the statue of chahatrapati shivaji maharaj that important letter came out)

हे वाचलं का?

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार राजकोट किल्ला परिसरात शिवाजी महाराजांचा पुतळा हा नौदलाच्या वतीने उभारण्यात आला होता. मागील वर्षी नौदल दिन हा मालवण किनाऱ्यावर साजरा करण्या आला होता. ज्यासाठी पंतप्रधान मोदी हे स्वत: तिथे हजर होते. याच कार्यक्रमाआधी पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं.

हे ही वाचा>> Chhatrapati Shivaji Maharaj: शिवरायांचा पुतळा कोसळला अन् ठाकरेंचा आमदार संतापला, 'ते' ऑफिसच फोडलं!

नौदल दिन हा साधारणपणे मुंबईत साजरा केला होता. मात्र, मागील वर्षी सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ आणि मालवण किनाऱ्यावर नौदल दिन साजरा करण्यात आला होता. त्याचनिमित्ताने राजकोट किल्ला येथे शिवाजी महाराजांचा पुतळा हा नौदलाच्या वतीने उभारण्यात आला होता. पण हा पुतळा उभारताना अत्यंत घाईगडबडीने तो उभारण्यात आला होता. हा पुतळा शास्त्रोक्त पद्धतीने उभारण्यात न आल्याने त्यात बऱ्याच त्रुटी होत्या.

हे ही वाचा>> Chhatrapati Shivaji Maharaj : धक्कादायक! शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, 9 महिन्यांपूर्वी PM मोदींनी केलेलं अनावरण

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागच्या मालवण येथील कार्यालयाने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची डागडुजी करण्यात यावी यासाठी सहा दिवसांपूर्वीच म्हणजे 20 ऑगस्ट 2024 रोजी नौदलाच्या अधिकाऱ्याला पत्रही पाठवलं होतं. आता तेच पत्र समोर आलं आहे. 

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या डागडुजीसाठी नौदलाला पाठवलेलं 'ते' पत्र जसंच्या तसं... 

दिनांक :- 20/08/2024

प्रति,
कमांडर, अभिषेक कारभारी 
(Area Coastal Security Officer, Area Civil Military Liaison Officer)

विषय :- नौसेना दिनानिमित्त उभारण्यात आलेल्या मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत

महोदय,

४ डिसेंबर २०२३ रोजी नौसेना दिनानिमित्त मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले होते. त्यानुषंगाने आपल्यामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारण्यात आलेला होता. जून महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शिल्पकार श्री. जयदीप आपटे यांच्याकडुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाची डागडुजी करण्यात आली होती. 

परंतु सद्यस्थितीत पुतळ्याचे जॉईंट करण्यासाठी आपण नट बोल्टचा वापर केला होता. त्या नट बोल्टला आता पावसामुळे व समुद्र किनाऱ्यावरील खारे वारे यामुळे गंज पकडला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विद्रूप दिसत आहे. तसेच राजकोट किल्ल्यावर पर्यटकांची वर्दळ वर्षभर सुरू असते. त्यामुळे पर्यटक, स्थानिक ग्रामस्थ, लोक प्रतिनिधी इ. यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आपले स्तरावरून संबंधित शिल्पकार यांना आदेश देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करणेबाबत तात्काळ कळविणे यावे, ही विनंती

सहाय्यक अभियंता (श्रेणी १)

सार्वजनिक बांधकाम उपविभाग, मालवण

अशा स्वरुपाचं पत्र हे नौदलाला पाठविण्यात आलं होतं. आता या पत्रानंतर या सगळ्या प्रकरणावर नेमकी कोणावर आणि कशा पद्धतीने कारवाई करण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp