Shishir Shinde : ठाकरेंची आणखी एका नेत्याने सोडली साथ, कारणही सांगितलं?

मुंबई तक

18 Jun 2023 (अपडेटेड: 18 Jun 2023, 05:04 AM)

गेल्या सहा महिन्यांपासून उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करतोय, पण उद्धव ठाकरे भेटत नाहीये, असा आरोप शिशिर शिंदे यांनी राजीनाम्यात केला आहे.

Uddhav Thackeray has once again suffered a setback in Maharashtra. Former party MLA Shishir Shinde has resigned from Shiv Sena (UBT).

Uddhav Thackeray has once again suffered a setback in Maharashtra. Former party MLA Shishir Shinde has resigned from Shiv Sena (UBT).

follow google news

Maharashtra political News Marathi : एकीकडे राज्यव्यापी शिबिरातून कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरण्याच्या प्रयत्नात असलेल्या उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला. शिवसेनेच्या जुन्या नेत्यांना ठाकरेंची साथ सोडली. माजी आमदार शिशिर शिंदे यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला. शिंदे यांनी ‘मातोश्री’वर जाऊन त्यांनी राजीनामा सुपूर्द केला.

हे वाचलं का?

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यव्यापी शिबीर मुंबई होत असून, एक दिवस आधी शिशिर शिंदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. राजीनामा देण्याचं सविस्तर कारणही शिशिर शिंदे यांनी सांगितलं आहे. यात उद्धव ठाकरे भेटीसाठी वेळ देत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ का सोडली?

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेता पदाचा राजीनामा देताना शिंदे यांनी काही आरोप केले आहेत. शिंदेंनी म्हटलं आहे की, गेल्या सहा महिन्यांपासून उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करतोय, पण उद्धव ठाकरे भेटत नाहीये. अनेक वेळा भेटीसाठी प्रयत्न केले, पण पक्षप्रमुखांची भेटतच नव्हते.

व्हिडीओ >> उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्याचं कधी ठरलं? आमदार देशमुखांनी सांगितली आतली गोष्ट

त्याचबरोबर शिशिर शिंदेंनी असंही म्हटलं आहे की, त्यांना मनासारखं काम करायलाही मिळत नव्हतं. उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, गेल्या चार वर्षांपासून त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी दिली गेली नाही. त्यानंतर केवळ नावापुरत पद दिलं गेलं. त्यामुळे राजकीय जीवनातील चार वर्ष वाया गेली.

कोण आहेत शिशिर शिंदे?

शिशिर शिंदे हे मूळचे शिवसैनिक आहेत. 2005 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा शिशिर शिंदेंनीही शिवसेना सोडली होती. तब्बल 13 वर्ष ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होते.

2009 मध्ये शिशिर शिंदे भांडुप विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. पुढे 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिंदेंना पराभवाला सामोरं जावं लागलं. मनसेत बराच काळ राहिल्यानंतर त्यांनी पक्षांतराचा निर्णय घेतला.

व्हिडीओ >> श्रीकांत शिंदेंच्या भाजप नेत्यांना कानपिचक्या, कल्याणचे खासदार काय म्हणाले?

19 जून 2018 मध्ये शिशिर शिंदे यांची शिवसेनेत घरवापसी झाली. बराच काळ ते अडगळीत गेले होते. 2022 पर्यंत त्यांच्यावर पक्षाने कोणतीही जबाबदारी दिली नाही. एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर म्हणजे 2022 मध्ये त्यांचं पक्षात पुनर्वसन करण्यात आलं. शिशिर शिंदे यांना उपनेता करण्यात आले होते. मात्र, उद्धव ठाकरे भेटत नाही, तसेच मनासारखे काम करू दिले जात नाही, म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिलीये.

भारत-पाक सामना, शिंदेंनी खोदली होती वानखेडेवरील खेळपट्टी

शिशिर शिंदे यांनी 1991 मध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्टीच खोदली होती. भारत-पाकिस्तान सामना होणार होता. पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने खेळवण्यास शिवसेनेने विरोध केला होता. याचाच भाग म्हणून शिशिर शिंदे आणि इतर काही शिवसैनिकांनी वानखेडेवर जाऊन खेळपट्टी खोदली होती.

    follow whatsapp