Shiv Sena MLA Disqualification: मुंबई: शिवसेना आमदार (Shiv Sena MLA) अपात्रता प्रकरणी सलग आज (22 नोव्हेंबर) सलग दुसऱ्या दिवशी विधिमंडळात सुनावणी पार पडली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या आजच्या सुनावणीत व्हीपवरुन बराच खल झाला. यावेळी ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये जोरदार वाद-प्रतिवाद पाहायला मिळाले. यावेळी ठाकरेंचे आमदार आणि प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांना व्हीपच्या मुद्द्यावरून जेठमलानी यांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. वाचा या आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं. (shiv sena mla disqualification fierce controversy over whip sunil prabhu mahesh jethmalani clash read hearing as it is)
ADVERTISEMENT
व्हीपवरुन रणकंदन.. वाचा आजची सुनावणी जशीच्या तशी
सुनावणीदरम्यान काय रेकॉर्डवर घेतलं जातं हे दिसण्यासाठी नवीन स्क्रीन लावण्यात आली होती.
काल ट्रान्सलेशनवरून वाद झाला होता आज ट्रान्सलेटर नेमण्यात आला
प्रभू यांची उलट तपासणी पुन्हा सुरू
जेठमलानी – 21 जून 22 चं हे पत्र पाहा, हे पत्र कोणाच्या अधिकारात देण्यात आले?
प्रभू – विधीमंडळ पक्षाची बैठक बोलवायची होती, विधान परिषदेच्या निवडणुकीत एका उमेदवाराचा पराभव झाला होता, काही आमदार संपर्कात येत नव्हते म्हणून विधानसभेच्या विधिमंडळाची बैठक बोलावून याची माहिती घ्यावी म्हणून प्रतोद या नात्याने बैठकीचा हा व्हीप दिला होता.
जेठमलानी – आपण हा व्हीप स्वतःच्या अधिकारात काढला असं म्हणणं योग्य राहील का?
प्रभू – परिषदेच्या निवडणुकीत झालेलं मतविभाजन, शिवसेनेचे काही आमदार मिसिंग होते, म्हणून ही बैठक पक्षप्रमुखांच्या आदेशाने बोलवली होती. म्हणून मी व्हीप दिला होता.
जेठमलानी – प्रभू तुम्हाला पक्षप्रमुखांनी लिखित स्वरूपात ही सूचना दिली होती का?
प्रभू – रेकॉर्डवर आहे.
जेठमलानी – लिखित दिला होता की नाही सांगा?
प्रभू – मी शपथ घेतली आहे, मी खोटं कसं बोलीन.
प्रभू – अशा बैठका बोलावल्या जातात तेव्हा ते फोनवर आदेश दिलेले असतात
प्रभू आधी रेकोर्डवर आहे असं म्हणाले त्यावरून जेठमलानी भडकले
जेठमलानी – पक्षप्रमुखांनी सूचना दिल्या तेव्हा तुम्ही कुठे होतात आणि ही सूचना मोबाइलवर की लॅण्डलाइनवर दिली?
प्रभू – ही सूचना मला दिली तेव्हा विधान परिषदेचं काउंटिंग संपून मी विधिमंडळात पक्ष कार्यालयात होतो. मिसिंगच्या बातम्या येऊन 3-4 तास होऊन गेले होते, तेव्हा तातडीची बैठक बोलवा असा फोन होता.
जेठमलानी – कोणत्या तारखेला निवडणुकीची मोजणी संपली?
प्रभू – मला तारीख आठवत नाही, ती तारीख रेकॉर्डवर आहे. माझ्या माहितीनुसार व्हीप दिल्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 20 तारखेला मतमोजणी होती.
प्रभू – 20 तारखेला संध्याकाळी मतमोजणी संपली
प्रभू – अंदाजे 8.30 – 9 वाजता मतमोजणी संपली होती असं मला वाटतं, पूर्ण मोजणीमुळे उशीर झाला होता
जेठमलानी – 32व्या प्रश्नाचं उत्तर पाहा, तुम्ही म्हणालात 3-4 तास झाले होते, त्यामुळे नेमक्या कुठल्या वेळेला तुम्ही व्हीप पाठवला होता.
प्रभू – मी काऊंटिंग संपल्यावर पार्टी ऑफिसला आलो माझ्यासोबत पक्षाचे आमदार होते, मतविभाजन कुठे झालं याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा पार्टी ऑफिसमध्ये 1 ते दीड तास झाले होते. आमदार मिसिंगच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. माझ्या माहितीप्रमाणे 10.30 ते 11.30 च्या दरम्यान. पक्ष प्रमुखांचा फोन आला मला बैठक बोलावण्याबाबतचा, त्यानंतर मी व्हीप तयार केला.
उत्तर स्पेसिफिक द्या असं नार्वेकर यांच्याकडून प्रभू यांनी सांगण्यात आलं
प्रभू – व्हीप तयार केल्यानंतर जे आमदार संपर्कात येत होते त्यांना व्हीप देण्याचा प्रयत्न केला
प्रभू संपूर्ण घटनाक्रम सांगत होते त्यामुळे स्पेसिफिक उत्तर हवं अशी मागणी जेठमलानी यांनी केली, त्यावर प्रभू यांनी मला पार्श्वभूमी सांगावी लागेल असं म्हंटलं, त्यावर नार्वेकर यांनी स्पेसिफिक उत्तर देण्याच्या सूचना केल्या
जेठमलानी – प्रभू, तुम्ही दावा करताय की 20 तारखेच्या उशिरा हा व्हीप दिलात, मात्र लिखित व्हीपवर तारीख 21 आहे. हे खरं आहे का ?
प्रभू – व्हीप तयार करेपर्यंत 11.30 – 12.00 वाजले होते. त्यामुळे मी रात्री पासून व्हीप जारी करताना मी 21 तारीख टाकून व्हीप वाटण्यास सुरुवात केली होती.
जेठमलानी – तुम्ही म्हणताय व्हीप वाटण्यास सुरुवात केली असं म्हणत आहात, कशा पद्धतीने तुम्ही व्हीप वाटण्यास सुरुवात केली.
प्रभू – सोबत जे आमदार होते त्यांना तात्काळ व्हीप दिले, जे आमदार निवासला होते त्यांना व्हीप पाठवून सुपूर्त केलं पण जे ट्रेस होत नव्हते त्यांना WhatsApp वर पाठवण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता
नार्वेकर – ही सुनावणी लवकरात लवकर संपावी यासाठी उत्तर स्पेसिफिक असावीत, आणि प्रश्न देखील स्पेसिफिक असावीत
जेठमलानी – तुमच्या सोबत कुठले आमदार होते?
प्रभू – मला आत्ता ते आठवत नाही
प्रभू – मी ते माझ्या affedivt मध्ये सांगितलं आहे, ते रेकॉर्डवर आहे
जेठमलानी – तुमचं affedevit पाहा, यात कुठे तुम्ही सोबत असलेल्या आमदारांबाबत म्हटलं आहे.
या प्रश्नवरून कामत यांनी आक्षेप घेतला, यात विसंगती आहेत असं ते म्हणाले
जेठमलानी – जर यात विसंगती असेल तर affedevit मध्ये काय आहे हे साक्षीदाराला दाखवायला हवं
जेठमलानी – प्रभू तुम्ही तुमचं प्रतिज्ञापत्र पाहा आणि यात नावं कुठे आहेत ते सांगा?
प्रभू – ऑन रेकॉर्ड आहेत
प्रभू यांच्या उत्तरावर जेठमलानी यांची नाराजी
प्रभू – आता माझे म्हणणे असे आहे की नावं affedevit मध्ये नाही, मी जी अपात्रता याचिका दाखल केली त्यात आहे.
जेठमलानी – तुमची अपात्रता याचिका पाहा, आणि त्यात दाखवा की कुठल्या पॅरामध्ये आमदार तुमच्यासोबत उपस्थित होते आणि ज्यांना तुम्ही व्हीप 20 जून 2022 ला दिला होता ते लिहिलं आहे.
प्रभू – पान 11, 12 ,13 वर ती नाव आहेत. परंतु मी ज्यांना व्हीप दिला 20 तारखेला त्यांची नाव आहेत राहुल पाटील, उदयसिंह राजपूत, सुनील राऊत, रमेश कोरगावकर, रविंद्र वायकर, सुनील प्रभू, माझा स्वतःचा प्रकाश फातर्फेकर, अजय चौधरी, भास्कर जाधव, राजन साळवी, वैभव नाईक, संजय पोतनीस यांना तिथे व्हीप दिला, बाकिच्यांना सिस्टीमप्रमाणे पाठवला.
प्रभू यांच्या उत्तरावरून बराच खल झाला, योग्य उत्तर रेकॉर्डवर यावं यासाठी ठाकरे गटाचा आग्रह.
प्रभू यांचं उत्तर योग्य पद्धतीने लिहून घेतलं गेलं
जेठमलानी – 20 च्या रात्री तुम्ही ज्यांना व्हीप दिलात त्यांनी लिखित स्वरूपात त्यांना व्हीप मिळाल्याची पोच पावती तुम्हाला मिळाली का?
प्रभू – ज्यांना प्रत्यक्ष व्हीप दिला त्याची लेखी पोच तुमच्याकडे आहे.
जेठमलानी – तुम्ही 20 जूनला कथिततरीत्या पोचपावती घेतली असं म्हणत आहात ते चुकीचे आहे. म्हणून तुम्ही त्या पोचपावत्या साक्षी दरम्यान उपस्थित केल्या नाही
प्रभू – हे खोटं आहे.
जेठमलानी – सेना पक्षप्रमुखांनी तुम्हाला नोटीस द्यायला लावली की व्हीप?
प्रभू – सेना पक्षप्रमुखांनी मला सांगितलं की मीटिंग घ्या, आणि महत्वाची बैठक आहे त्यामुळे व्हीप लावा असा सल्ला दिला होता.
जेठमलानी – 2022 मध्ये शिवसेना पक्षाची अशी पद्धत आहे का की ज्यांनी व्हीप जारी केला आहे त्यांनी स्वीकारावा?
प्रभू – कार्यपद्धती होती. ज्याने व्हीप जारी केला तो देखील इतर आमदारांप्रमाणे विधिमंडळाचा सदस्य असतो त्यामुळे ज्याने जारी केला त्याने स्वीकारायचा असतो.
जेठमलानी – 20 जूनच्या रात्री, तुम्ही देखील लिखित दिलं होतं का की तुम्ही व्हीप स्वीकारला आहे?
प्रभू – मी घेतलेल्या व्हीपची पोचपावती द्यावीच लागते.
प्रभू – आणि मी दिली
जेठमलानी – तुम्ही ज्या व्हीपची पोचपावती दिली असं म्हणता तो व्हीप तुम्हाला कोणी आमदाराने दिला की तुम्हीच दिला?
प्रभू – व्हीपवर मी सही केल्यानंतर व्हीप देण्याचं काम पार्टी ऑफिसचे कर्मचारी करतात.
जेठमलानी – मी तुम्हाला पुन्हा विचारतो की तुम्हाला व्हिप डॉक्युमेंट कोणी दिलं? आपण व्हिप जारी करताना व्हिपवर स्वाक्षरी केली मी तुम्हाला पुन्हा विचारतो की तुम्हाला व्हिपचं डॉक्युमेंट कोणी दिलं?
सुनील प्रभू – मी व्हिपवर सही केल्यावर पार्टी कार्यालयात काम करणारे जबाबदार कर्मचारी व्हिप डॉक्युमेंट स्वीकारतात. मी देखील पक्ष कार्यालयात नियमानुसार व्हिप स्वीकारला. व्हिप स्वीकारल्याच्या सहीचा कागद त्या कर्मचाऱ्याकडे दिला.
जेठमलानी – तुमच्या याचिकेतील पी 1 पाहा, 21 जूनचा व्हीप आहे. यावर तुमची सही आहे का?
प्रभू – नाव आहे म्हणजे माझीच सही आहे, माझी खोटी सही कोण करेल?
जेठमलानी – प्रतिज्ञापत्र आणि तुमची व्हीपवरील सही ही सेम वाटत नाही. तुमच्या 2 स्वाक्षरी आहे का?
प्रभू – माझ्या दोन स्वाक्षऱ्या आहेत. मी पूर्ण सही करताना एस डब्लू प्रभू अशी करतो. एनिशीयल लिहिताना एस पी अशी करतो. (यावेळी प्रभू यांनी व्हीप दाखवला) मी विधिमंडळ सदस्य म्हणून आणि व्हीप म्हणून आत्तापर्यंत ज्या सह्या केल्या त्या अशाच आहेत.
जेठमलानी – 21 जून 2022 च्या आधी तुम्ही किती लिखित व्हीप जारी केले आहेत
प्रभू – मला जे स्मरण आहे त्याप्रमाणे त्या कार्यकाळात 2 निवडणुका झाल्या, एक राज्यसभेची आणि एक विधान परिषदेची दोन्ही निवडणुकांचे व्हीप यापूर्वी मी जारी केले.
जेठमलानी – तुम्ही हा orginal व्हीप दाखवण्याआधी हा कोणाकडे होता? आणि कुठे होता?
प्रभू – या संदर्भातील कागदपत्र पक्षाच्या कार्यालयात ज्या जागेवर ठेवतो त्याठिकाणी हे ठेवलं होतं, (विधानसभेच्या पक्ष कार्यालयात नाही)
नार्वेकर यांनी प्रभू यांना विधानसभा पक्ष कार्यालय की विधिमंडळ पक्ष कार्यलय म्हणायचं आहे. याबाबत क्लेरिफिकेशन घेतलं. त्यानंतर प्रभू यांनी त्यांना विधिमंडळ पक्ष कार्यालय म्हणायचं होतं असं सांगितलं.
जेठमलानी – तुम्ही हा व्हीप कधी तयार केला?
या प्रश्नावर कामत यांनी आक्षेप घेतला, या प्रश्नाचं उत्तर आधीच दिलं आहे अस कामत यांनी सांगितलं.
त्यावर अध्यक्षांनी आधीचे प्रश्न आणि उत्तर पाहिलं
35 आणि 36 व्या प्रश्नात याचं उत्तर दिलं आहे असं कामत यांनी सांगितलं
नार्वेकर यांनी आक्षेप स्वीकारला
जेठमलानी – 20 जून 2022 ला हाच तो व्हीप आहे का जो उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनंतर तयार केला?
प्रभू – उद्धव ठाकरे यांनी मला बैठक घ्यायला सांगितली होती, त्यावेळच्या परिस्थितीमध्ये आमदार मिसिंग असल्याने या बैठकीचा व्हीप बजावण्यात यावा ते महत्वाचे आहे. असा सल्ला त्यांनी मला दिला होता, त्यावेळी प्रतोद म्हणून माझी जी जबाबदारी होती त्यानुसार मी हा व्हीप सर्व आमदारांना बजावला होता.
जेठमलानी – 20 जूनला विधानपरिषदेची निवडणूक झाली, बरोबर ना?
प्रभू – हो
जेठमलानी – शिवसेनेच्या सर्व आमदारांनी मतदान केलं होतं का?
प्रभू – शिवसेनेच्या सर्व आमदारांनी मतदान केलं
जेठमलानी – 20 जूनला जर सर्व शिवसेनेच्या आमदारांनी मतदान केलं होतं, तर मग कुठले शिवसेनेचे आमदार मिसिंग होते?
प्रभू – शिवसेनेच्या सर्व आमदारांनी मतदान केलं होतं. याची पडताळणी करायची असेल तर विधानमंडळच्या पटलावरून त्याची खात्री करू शकता.
प्रभू – निकाल लागल्यानंतर वाहिन्यांवर बातम्या येऊ लागल्या, की शिवसेनेचे काही आमदार मिसिंग आहेत, त्यांनतर संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यानंतर अनेक आमदारांचे फोन बंद होते, त्यावेळी शिवसेनेचे बरेच आमदार मिसिंग आहेत आणि ते गुजरातच्या दिशेने गेल्याच्या बातम्या येत होत्या.
प्रभू यांच्या उत्तरावर जेठमलानी यांनी आक्षेप घेतला, प्रभू योग्य उत्तर देत नसल्याचे ते म्हणाले, त्यावर हा आरोप खरा नाही असं प्रभू म्हणाले
प्रभू – मी ज्यांना हातोहात व्हीप द्यायला लावले ते मुंबईमध्ये होते, ज्यांचे फोन लागत नव्हते ते मिसिंग होते, त्यांना बैठकीचा व्हीप पाठवणं आवश्यक होतं
नार्वेकर यांनी कामत यांना सांगितलं की प्रभू यांना संक्षिप्त उत्तर द्यायला सांगावं
त्यावर प्रभू म्हणाले इतके प्रश्न विचारले जातात की संक्षिप्त उत्तर देता येत नाही
त्यांनतर मी संक्षिप्त उत्तर द्यायचा प्रयत्न करीन असं प्रभू म्हणाले
त्यावर प्रश्न किती जरी असले तरी संक्षिप्त उत्तर दिलं तर सुनावणी लवकर होईल असं नार्वेकर म्हणाले
जेठमलानी प्रभू यांच्या उत्तरावर भडकले
असे कसे उत्तर दिलं जाऊ शकतं अस जेठमलानी म्हणाले, त्यांनी afedevit दिलं आहे, आणि ते उत्तरं व्यवस्थित देत नाही. ते आमदार आहेत त्यांनी योग्य उत्तरं द्यायला हवीत.
जेठमलानी यांचा आवाज वाढला होता, कामत यांनी हळू बोलायला सांगितलं यावरून कामत आणि जेठमलानी यांच्यात शाब्दिक चकमक झाली
नार्वेकर यांनी दोघांना शांत राहायला सांगितलं
नार्वेकर यांनी प्रभू यांना आमदारांची नावं सांगायला सांगितली
प्रभू – मी एवढंच सांगतो की 21 तारखेच्या बैठकीला जे गैरहजर होते, ते मिसिंग होते.
21 ची मीटिंग सुरु झाल्यानंतर 2 तासांनी सुद्धा जे आले नाहीत त्यांना मी मिसिंग म्हणतो.
नार्वेकर म्हणाले, या वेगाने सुनावणी झाली तर ती 31 च्या आधी होणं शक्य नाही त्यामुळे दोन्ही पक्षाने सहकार्य केलं पाहिजे.
त्याचबरोबर नार्वेकर यांनी पुढील सगळं शेड्युल सांगितलं
नार्वेकर यांनी पुन्हा दोघांना सहकार्य करण्यास सांगितलं
नार्वेकर म्हणाले आजनंतर 16 दिवस आपल्याला सुनावणीसाठी मिळत आहेत. सुट्या आणि इतर सर्व गोष्टी पाहता.
ज्या गतीने सुनावणी सुरू आहे त्यावर विधानसभा अध्यक्षांची नाराजी व्यक्त केली
फक्त 16 दिवस माझ्याकडे या सुनावणी साठी आहे त्यात या प्रकरणाची सुनावणी संपवून निर्णय घ्यायचा आहे
अध्यक्ष – मला 31 डिसेंबरपर्यंत प्रकरणांची सुनावणी संपवायची आहे, सार्वजनिक सुट्या आणि अधिवेशन कालावधी वगळता माझ्याकडे या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्याकरिता फक्त 16 दिवसाचा कालावधी आहे
जेठमलानी – तुम्ही जो व्हीप सादर केला आहे तो 20 जूनला तयार केला नाही
प्रभू – हे खोटं आहे
जेठमलानी – तुम्ही जेव्हा ओरिजिनल व्हीप तयार करता तेव्हा तुम्ही ज्याला पाठवतात त्याचं नाव लिहीत नाही, असं अपल्याला म्हणायचे का
प्रभू – orginal पक्षादेश जो सदस्याला पाठवला जातो त्यावर सदस्याचं नाव नसतं
जेठमलानी – orignal व्हीप पाहा, पक्षादेश क्रमांक 2 असं लिहिलं आहे. हे खरं आहे का की 2022 मध्ये शिवसेनेने दुसराच व्हीप काढला आहे?
प्रभू – मी आत्ता सांगू शकत नाही
जेठमलानी – हे तर खरं आहे ना की हा व्हीप तयार केला होता आणि तुम्ही 2 हा क्रमांक टाकला होता.
प्रभू – 2/22 हा नंबर हा पक्षाच्या कामकाजाचा भाग आहे. त्याबाबत मी आता निश्चित माहिती देऊ शकत नाही परंतु हा व्हीप मी काढला आणि सही केली
जेठमलानी – या व्हीपची मूळ कॉपी पाहिली तर त्यात वरती पक्षादेश 2/22 याचा अर्थ असा आहे का की हा दुसरा व्हीप आहे 2022 वर्षातील जो शिवसेना विधिमंडळ पक्षाकडून पाठवण्यात आला आहे.
प्रभू – मी याबाबत आता सांगू शकत नाही.
जेठमलानी – हा व्हीप जर तुम्हीच तयार केला म्हणत असाल तर 02/22 हा व्हीप नंबर तुम्हीच लिहिला आहे का?
प्रभू – मी व्हीप बनवला मी सही केली 02/22 हा नंबरबाबत मी आता सांगू शकत नाही.. हा पक्षाच्या कामकाजाबद्दल भाग आहे त्याबद्दल मला माहिती घ्यावी लागेल.
जेठमलानी – आपण दोन व्हिप जारी केले होते. 21 जून 2022 रोजीच्या व्हिपवरील नंबर forgery (बनावटी) आहे.
प्रभू – हे चूक आहे.
हे ही वाचा>> MLA Disqualification: ठाकरे गटाने दिलेले ‘ते’ 23 पुरावे, जसेच्या तसे, ‘त्या’ आमदारांचं काय होणार?
यानंतर आजच्या (22 नोव्हेंबर) दिवसाची सुनावणी ही संपली. आता यापुढचे काही दिवस ही सुनावणी सलग चालणार आहे. त्यामुळे याबाबत विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT