शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लांबणार! असं आहे सुनावणी वेळापत्रक

ऋत्विक भालेकर

27 Sep 2023 (अपडेटेड: 27 Sep 2023, 03:40 AM)

tentative schedule of Shiv Sena MLA disqualification hearing : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणीचे वेळापत्रक निश्चित झालं आहे. विधिमंडळ सचिवालयाकडून हे जाहीर करण्यात आले असून, 13 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर या काळात ही सुनावणी होणार आहे.

mumbaitak

mumbaitak

follow google news

Shiv Sena MLAs Disqualification News in Marathi : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी घेण्याचं वेळापत्रक द्या, असं सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर अखेर कार्यवाही सुरू झालीये. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आता आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचं वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. 13 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबरपर्यंत या कालावधीत प्रकरणावरील सुनावणी चालणार आहे. त्यामुळे लवकर निर्णय घेण्याची मागणी करणाऱ्या शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अजून बरीच प्रतिक्षा करावी लागणार, असंच दिसतंय.

हे वाचलं का?

शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी वेळापत्रक

-13 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीत युक्तिवाद होणार आहे.

– 23 नोव्हेंबरनंतर दोन आठवड्यांनी अंतिम सुनावणी होणार आहे.

– सर्व याचिकांच्या एकत्रीकरणावर (क्लबिंग) सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

– 13 ते 20 ऑक्टोबर दरम्यान विधिमंडळात शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकमेकांना दिलेल्या कागदपत्रांची छाननी केली जाणार आहे.

– सर्व याचिकांचे एकत्रीकरण (क्लब) करायचे की नाही यावर 20 ऑक्टोबर रोजी निकाल दिला जाईल.

हेही वाचा >> सुप्रीम कोर्टानं वापरलेले ‘हे’ दोन शब्द… अन् CM शिंदेंचं भवितव्य

– याशिवाय 20 ऑक्टोबर रोजी कोणत्याही गटाला काही अतिरिक्त कागदपत्रे सादर करायची असल्यास संधी दिली जाईल.

– दोन्ही गट 27 ऑक्टोबर रोजी लेखी म्हणणे मांडतील.

– 6 नोव्हेंबरपर्यंत दोन्ही गट आपली बाजू मांडतील आणि दावे-प्रतिदावे करतील.

– दोन्ही गटांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर 10 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

– 20 नोव्हेंबर रोजी दोन्ही गटांच्या साक्षीदारांची यादी सादर केली जाईल.

– 23 नोव्हेंबर रोजी साक्षीदारांची उलटतपासणी होणार आहे.

हेही वाचा >> शरद पवारांना धक्का… मुंबईतील ‘या’ निवडणुकीत मोठा पराभव

– सर्व पुरावे तपासल्यानंतर पुढील दोन आठवड्यांत अंतिम सुनावणी होणार आहे.

– 23 नोव्हेंबरपासून उलट चौकशी सुरू होईल आणि पुढील तारखा दोन्ही गट आणि त्यांच्या वकिलांच्या सोयीनुसार दिल्या जातील.

– आठवड्यातून किमान दोन वेळा उलट चौकशी सुनावणी घेतली जाईल.

– पुरावे सादर केल्यापासून दोन आठवड्यांनंतर याचिका अंतिम सुनावणीसाठी सूचीबद्ध केली जाईल.

– दोन्ही गटांना हे लक्षात घ्यावे लागेल की वर निश्चित केलेले वेळापत्रक शक्य तितके पाळले जाईल आणि केवळ अपरिहार्य परिस्थितीत स्थगित केले जाईल किंवा बदलले जाईल आणि कोणतेही बदल असल्यास, गटांना अगोदर सूचित केले जाईल.

हेही वाचा >> ‘आम्हाला सुनावणीचं वेळापत्रक सांगा’, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर गेल्या वर्षी जूनमध्ये शिवसेनेत फूट पडली होती. शिंदे आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांविरोधात ठाकरे गटाने अपात्रतेची याचिका दाखल केली होती. शिंदे आणि ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या आमदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकांवर 13 ऑक्टोबर रोजी अधिकृत सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

    follow whatsapp