Shiv Sena Portfolio list: भाजपने शिंदेंना गृह खातं दिलंच नाही, शिवसेनेला नेमकं काय-काय मिळालं?

मुंबई तक

• 11:26 PM • 21 Dec 2024

Shiv Sena Portfolio Allocation: भाजपने गृह, महसूल ही खाती स्वत:कडे ठेवली आहेत. अशावेळी शिवसेनेला कोणती खाती दिली याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. पाहा शिवसेनेला कोणती खाती मिळाली.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

भाजपने गृह खातं स्वत:कडेच ठेवलं

point

शिवसेनेला गृह आणि महसूल खातं दिलंच नाही

point

पाहा शिवसेनेला कोणती खाती मिळाली

Shiv Sena Portfolio: मुंबई: मुख्यमंत्री पद न मिळाल्यास किमान गृह खातं द्यावं यासाठी शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे हे बरेच दिवस अडून बसले होते. मात्र, काहीही झालं तरी गृह खातं हे मिळणार नाही. यावर भाजप ठाम होतं आणि शेवटपर्यंत ठाम राहीलं. कारण आज (21 डिसेंबर) जाहीर झालेल्या खाते वाटपात भाजपने विशेषत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत:कडेच गृह खातं ठेवलं आहे. अशावेळी शिंदेंच्या शिवसेनेला नेमकं काय मिळालं हे आपण आता पाहूया. (shiv sena portfolio list bjp did not give eknath shinde the home portfolio what exactly did shiv sena get)

हे वाचलं का?

भाजपने गृह आणि महसूल ही अत्यंत महत्त्वाची खाती ही स्वत:कडे ठेवली आहेत. तर त्याऐवजी त्यांनी शिवसेनेला नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम, उद्योग आणि आरोग्य ही महत्त्वाची खाती दिली आहेत.

हे ही वाचा>> Portfolio Allocation: अखेर... खाते वाटप जाहीर! शिंदे-अजितदादांना भाजपने काय दिलं?, पाहा संपूर्ण यादी

आता या महत्त्वाच्या खात्यांपैकी नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम ही खाती स्वत: एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे ठेवली आहेत. त्यामुळे आता त्यांनी आपल्या मंत्र्यांना नेमकी कोणती खाती दिली आहेत यावर टाकूया एक नजर. 

शिवसेनेला कोणती खाती?

एकनाथ शिंदे - उपमुख्यमंत्री, नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

 

  • गुलाबराव पाटील - पाणी पुरवठा आणि स्वच्छता
  • दादा भुसे - शालेय शिक्षण
  • संजय राठोड - मृद व जलसंधारण
  • उदय सामंत - उद्योग, मराठी भाषा
  • शंभूराज देसाई - पर्यटन, खाणकाम, माजी सैनिक कल्याण
  • संजय शिरसाट - सामाजिक न्याय
  • प्रताप सरनाईक - परिवहन
  • भरतशेठ गोगावले - रोजगार हमी, फलोत्पादन, खार जमीन विकास
  • प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
  • आशिष जैस्वाल (राज्यमंत्री) - अर्थ आणि नियोजन, कृषी, मदत आणि पुनर्वसन, कायदा आणि न्यायव्यवस्था, कामगार
  • योगेश कदम (राज्यमंत्री) - गृह (शहर), महसूल, ग्रामीण विकास आणि पंचायती राज, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन

हे ही वाचा>> Partywise Portfolio Allocation: भाजपकडे गृह, महसूल.. महायुतीत कोणत्या पक्षाकडे कोणती खाती?


शिवसेना उत्पादन शुल्क आणि महसूल या दोनही खात्यांसाठी देखील आग्रही होती मात्र, त्यापैकी महसूल हे भाजपने स्वत:कडे ठेवलं आहे. तर उत्पादन शुल्क हे राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं आहे.

दरम्यान, या मंत्रिमंडळ वाटपावर नजर टाकल्यास भाजपने काही प्रमाणात समतोल राखण्याचा प्रयत्न केला असल्या असल्याचे पाहायला मिळतं आहे. कारण शिवसेनेकडे पूर्वी जी खाती होती त्यापैकी बरीच खाती ही जवळजवळ त्यांनाचा देण्यात आली आहेत.

 

    follow whatsapp