Bharat Gogawle: 'चु%&# बनवणारी बहीण पाहिजे?', भरत गोगावलेंचं महिलेबाबत आक्षेपार्ह विधान

मुंबई तक

• 12:02 AM • 12 Oct 2024

शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते भरत गोगावले यांनी महिलांबाबत एक आक्षेपार्ह विधान केल्याने अडचणीत आले आहेत.

भरत गोगावलेंचं महिलेबाबत आक्षेपार्ह विधान

भरत गोगावलेंचं महिलेबाबत आक्षेपार्ह विधान

follow google news

महाड: शिवसेना (शिंदे गट) पक्ष प्रतोद आणि महाडचे आमदार भरत गोगावले यांनी आज (11 ऑक्टोबर) महाड येथील कार्यक्रमात बोलताना शिवसेना (UBT)महिला नेत्या व संभाव्य उमेदवार स्नेहल जगताप यांचं नाव न घेता अत्यंत अश्लाघ्य शब्दात टीका केली आहे. (shiv sena shinde group mla bharat gogawle objectionable statement about woman)

हे वाचलं का?

एका महिलेबाबत आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याने आता भरत गोगावले यांच्याविरोधात सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय भाष्य करताना गोगावले यांची जीभ घसरल्याने आता ठाकरे गटाकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तसेच रायगडमधील नेत्या स्नेहल जगताप यांनी गोगावले यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा चांगलाच समाचार घेत थेट मुख्यमंत्र्यांनाच खडा सवाल विचारला आहे.

भरत गोगावले यांचं महिलेबाबत वादग्रस्त विधान

एका जाहीर कार्यक्रमात बोलताना भरत गोगावले म्हणाले की, 'आम्ही काही थोडीफार मदत.. आणि प्रत्येक गावात विकास.. मग सांगा तुम्हाला कोण पाहिजे.. काम करणारा भाऊ पाहिजे का चु% बनवणारी बहीण पाहिजे? हे लक्षात ठेवा..'   

'एकीकडे लाडकी बहीण योजना राबवायची अन् दुसरीकडे...', स्नेहल जगताप संतापल्या 

दरम्यान, मुळात पक्ष प्रतोद महोदयांना असं वाटतं की, बेताल वक्तव्य केलं की, त्यांना वेगळीच प्रसिद्धी मिळते. बेताल वक्तव्य करून प्रसिद्धी मिळविण्याची त्यांची जुनीच नाटकं आहेत. 

एकीकडे महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवायची आणि दुसरीकडे समस्त महिला वर्गासाठी अशाप्रकारचं आक्षेापार्ह वक्तव्य करायचं हे खरंच निंदनीय आहे. 

जे वक्तव्य त्यांनी केलंय किंवा ज्या चुकीच्या शब्दाचा वापर त्यांनी केलेला आहे.. निश्चितपणे शिवसेना (UBT) पक्षाची संभाव्या उमेदवार ही महिला आहे त्यामुळे जाणूनबुजून मला उद्देशून केलेलं हे वक्तव्य आहे. 

ते करत असताना.. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, हेच का त्यांचे संस्कार? हे मी त्यांना विचारू इच्छिते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान आहे की, अशा पद्धतीचं वक्तव्य जे आपल्या पक्षाचे प्रतोद यांनी केलेलं आहे त्यावर आपण गंभीर गुन्हा दाखल करणार आहात का? जर गुन्हा दाखल करणार नसाल तर आपली काय भूमिका आहे हे समस्त महिला वर्गाला आपण दाखवून द्यावं. असं म्हणत स्नेहल जगताप यांनी संताप व्यक्त केला.

    follow whatsapp