मुंबई: शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानामुळे राज्याच्या विधिमंडळात देखील गदारोळ पाहायला मिळाला होता. त्यांच्या अटकेची मागणी देखील झाली. मात्र, याचवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिडे यांना गुरुजी म्हटलं होतं. त्यावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतलेला. असं असताना आता याच मुद्द्यावरुन शिवसेना (UBT) पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस, संभाजी भिडे आणि भाजपवर जहरी टीका करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
‘महाराष्ट्रात आगी लावण्याचे कंत्राट कोणी घेतले असेल तर जनतेने सावध राहायला हवे. फडणवीसांना गुरुजी असतील, पण महाराष्ट्राची अकरा कोटी जनता हेडमास्तर आहे. मणिपूर, हरयाणाच्या वाटेने महाराष्ट्र जाणार नाही. फडणवीसांना हे असे गुरुजी लाभल्यानेच महाराष्ट्र शिवरायांच्या, फुले, आंबेडकर, शाहूंच्या मार्गापासून भरकटताना दिसत आहे.’ अशा शब्दात अग्रलेखातून फडणवीसांवर निशाणा साधण्यात आला आहे.
ADVERTISEMENT