Eknath Shinde: मुंबई: राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे मुंबईतील आझाद मैदानावर शपथ घेणार आहेत. पण असं असलं तरीही शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही यावरून बराच घोळ सुरू आहे. काल (4 डिसेंबर) रात्री खुद्द फडणवीसांनी एकनाथ शिंदेंची भेट घेऊन त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं अशी गळ घातली. मात्र, अद्यापही शिंदे यासाठी तयार झालेले नाहीत. असं असताना आता त्यांच्याच पक्षातील दिग्गज नेते उदय सामंत यांनी मात्र एक खळबळजनक विधान केलं आहे. (shiv sena will not join the government sensational statement by shinde veteran leader uday samant)
ADVERTISEMENT
'या सगळ्या सिस्टिममध्ये (सत्तेत) एकनाथ शिंदे साहेब राहणार नसतील तर आम्ही तरी त्या सिस्टिममध्ये राहून काय उपयोग आहे?' असं म्हणत सामंतांनी पत्रकार परिषदेत मोठं विधान केलं आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून गृहमंत्री पदासाठी दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचं बोललं जात आहे.
हे ही वाचा>> Maharashtra CM Oath Ceremony Online : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा थेट कुठे पाहायचा?
जर एकनाथ शिंदे हे सत्तेत सहभागी झाले नाही तर त्यांचे सहकारी देखील सत्तेत सहभागी होणार नाहीत. त्यामुळे आता या सगळ्याबाबत भाजप नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
पाहा उदय सामंत नेमकं काय म्हणाले?
'आमच्या कोणाच्याही मनात असं नाही की, आम्ही उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसावं. आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनीच या पदावर बसलं पाहिजे ही आमची इच्छा आहे. आम्ही जे मंत्री होतो ते आणि सर्व आमदारांनी काल साहेबांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना आम्ही विनंती केली की, तुम्ही उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं पाहिजे.'
'आम्हाला विश्वास आहे की, शिंदे साहेब या गोष्टीचा अर्धा-एक तासात सकारात्मक विचार करतील आणि आमची इच्छा पूर्ण करतील.'
हे ही वाचा>> Maharashtra CM Oath Ceremony LIVE updates : "रात्री आम्ही सर्व आमदारांनी आग्रह केला, तेव्हा एकनाथ शिंदे तयार झाले"
'शिंदेंना आम्ही सांगितलं आहे की, त्यांनीच उपमुख्यमंत्री व्हायला हवं. चौथं कोण शपथ घेणार हे अद्याप कोणालाही माहिती नाही. एक लक्षात घ्या की, आमची सर्वांची भावना आहे. आमची जी अटॅचमेंट आहे शिंदे साहेबांसोबत पक्ष म्हणून नक्की आहे. पण कुटुंबातील व्यक्ती म्हणूनही आहे.'
'आम्ही कुटुंब म्हणून काम करतो. म्हणून आम्हाला असं वाटतं की, या सगळ्या सिस्टिममध्ये एकनाथ शिंदे साहेब राहणार नसतील तर आम्ही तरी त्या सिस्टिममध्ये राहून काय उपयोग आहे?' असं विधान उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना केलं आहे.
ADVERTISEMENT
