Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी राज्यासह केंद्रावर जोरदार निशाणा साधला. यावेळी बोलताना त्यांनी इंडिया बैठकीचं आणि त्यावर विरोधकांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. इंडिया म्हणजे हुकुमशाही आघाडीविरोधात आम्हाला मिळालं मानाचं स्थान त्यामुळेच सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
माताभगिनींवर लाठीहल्ला
उद्धव ठाकरे यांनी बोलताना कालच्या मराठा आक्रोश मोर्चाच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जवरही त्यांनी निशाणा साधला आहे. ज्या लोकांना इंडिया विरोधात बोलायला वेळ आहे मात्र आंदोलकांना भेटायला वेळ नाही त्याच लोकांनी आंदोलनातील माताभगिनींवर लाठीहल्ला केला असल्याची टीकाही त्यांनी केली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसा यांच्यापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जोरदार टीका केली आहे.
हे ही वाचा >>Aditya L1 Launch : चंद्रानंतर आता सूर्य, इस्रोचं आदित्य L1 कसं झेपावलं सूर्याच्या दिशेने? पाहा थरारक क्षण
आंदोलनं मोडीत काढण्याचा डाव
या राज्य सरकारला फक्त लाठीचार्ज करता येतो, कारण आधी बारसू आंदोलनावर लाठीहल्ला केला, त्यानंतर वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला तर आता शांततेते चाललेल्या आंदोलनावर या सरकारने लाठीचार्ज करुन लोकांची आंदोलनं मोडीत काढण्याचाच प्रयत्न केला असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
हे ही वाचा >> ‘इंडिया’च्या बैठकीत उद्धव ठाकरे येताच काय झालं?
थापा मारा लई भारी
उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका करताना शासन आपल्या दारी कार्यक्रमावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी सरकार आपल्या दारी, थापा मारा लई भारी अशा शब्दात त्यांनी सरकारचा समाचर घेतला आहे. यावेळी त्यांनी हे सरकार म्हणजे भाड्याने चालवलेला पक्ष असल्याचे सांगत भाजपवर त्यांनी घणाघात केला आहे.
भारत बंदमध्ये आम्ही नाही
राज्य सरकार गणपतीच्या काळात विशेष अधिवेशन घेत आहेत. त्यावरून भाजपच्या आंदोलनाची त्यांनी 2012 मधील आठवण सांगितली. यावेळी त्यांनी 2012 सालीही त्यांनी असाच भारत बंदची हाक दिली होती. मात्र त्यावेळी आम्ही भारत बंदमध्ये सहभागी झालो नव्हतो असंही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
विशेष अधिवेशनात न्याय द्या
विरोधकांच्या बैठकीवर सत्ताधाऱ्यांना बोलायला वेळ आहे. आमच्या इंडियाच्या बैठकीवर टीका करायला तयार असलेले मणिपूरवर मात्र बोलायला तयार नसतात. मराठा आरक्षणाचा मुद्दाही यांना महत्वाचा वाटत नाही. त्यामुळे आम्ही अशी मागणी करतो की, तुम्ही घेत असलेल्या विशेष अधिवेशणात वटहुकूम काढून न्याय द्या अशी मागणीही त्यांनी केली.
ADVERTISEMENT