Vijay Shivtare: "मंत्रिमंडळात शेवटपर्यंत नाव होतं माझं, अचानक..."; आमदार विजय शिवतारेंच्या विधानामुळे खळबळ

Vijay Shivtare On Maharashtra Cabinet Expansion:  राज्याच्या मंत्रिमंडळात महायुतीच्या एकूण 39 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा काल रविवारी नागपूरच्या राजभवनात पार पडला.

Vijay Shivtare On Maharashtra Cabinet Expansion

Vijay Shivtare On Maharashtra Cabinet Expansion

मुंबई तक

• 05:47 PM • 16 Dec 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

मंत्रिमंडळाता स्थान न मिळाल्यानंतर विजय शिवतारेंनी दिली मोठी प्रतिक्रिया

point

"अडीच वर्षानंतर मंत्रीपद दिलं तरी..."

point

विजय शिवतारे नेमकं काय म्हणालेय़

Vijay Shivtare On Maharashtra Cabinet Expansion:  राज्याच्या मंत्रिमंडळात महायुतीच्या एकूण 39 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा काल रविवारी नागपूरच्या राजभवनात पार पडला. परंतु, मंत्रिपदाची आशा बाळगून राहिलेल्या काही बड्या नेत्यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रीपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली. अशातच आता शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनीही मंत्रिमंडळात स्थान न मिळण्याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

हे वाचलं का?

विजय शिवतारे काय म्हणाले ?

शेवटपर्यंत नाव होतं, अचानक कट झालं. त्यामुळे नाराजी निश्चित आहे. त्यामागची कारणमीमांसा मी पाहिली. महाराष्ट्रात कर्तृत्व, काम चालायचं, प्रातं चालायचे, विभागवार प्रतिनिधित्व द्यायचे. पण आता आपण बिहारकडे चाललोय. जातीयवादाच्या राजकारणामुळे बिहारचा विकास झाला नाही. आपण सगळे मिळून तिकडेच चाललो आहोत. माझ्यासाठी मंत्रिपद महत्त्वाचं नाही. माझी कामे महत्त्वाची आहेत. मला लोकांनी निवडून दिलं आहे. विभागीय नेतृत्व दिलं जायचं.

हे ही वाचा >>  Sudhir Mungantiwar: "मंत्रिमंडळात माझं नाव असल्याचं सांगितलं आणि..."; सुधीर मुनगंटीवारांनी सगळंच सांगून टाकलं

उपयुक्त लोकांच्या हातात सत्ता देत महाराष्ट्र आम्ही पुढे नेला होता. आपण कुठेतरी पाठीमागे चाललोय. आपण कुठेतरी बिहारच्या बाजूने चाललोय. जातीयवादीपणा जो सुरु आहे, तो धोकादायक आहे. माझं नाव कट झाल्याबद्दल मला अजिबात दु:ख नाही. लोकांना विश्वासात घेऊन काम करायला पाहिजे. ते न झाल्याने नाराजी शंभर टक्के आहे. अडीच वर्षानंतर मंत्रीपद दिलं तरी मी घेणार नाही. माझ्या मतदारसंघातली कामे मुख्यमंत्र्यांकडून करून घेणे, एवढच आहे. मंत्रिपदाबद्दल मला राग नाही. वागणुकीबद्दल प्रचंड राग आहे.

हे ही वाचा >> Chhagan Bhujbal: छगन भुजबळ राष्ट्रवादीला करणार बायबाय? अजितदादांची सोडणार साथ? मोठी अपडेट आली समोर

दरम्यान, शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांचाही मंत्रिमंडळातून पत्ता कट झाला आहे. तर संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रकाश अबिटकर, योगेश कदम, आशिष जैस्वाल, प्रताप सरनाईक या आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे. आता ज्या नेत्यांचं मंत्रीपद हुकलं आहे, त्यांना पुढील अडीच वर्षात मंत्रिपदाची संधी मिळते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

    follow whatsapp