Akshay Shinde Encounter :एन्काऊंटर की हत्या? आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू कसा झाला? खासदार नरेश म्हस्के म्हणाले..

विक्रांत चौहान

24 Sep 2024 (अपडेटेड: 24 Sep 2024, 01:27 PM)

Naresh Mhaske On Akshay Shinde Encounter : बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षयचा एन्काऊंटर केला.

Akshay Shinde Encounter Inside Story

Akshay Shinde Encounter Latest News

follow google news

बातम्या हायलाइट

point

आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर कुणी केला?

point

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर की हत्या? खासदार नरेश म्हस्के यांनी दिली मोठी प्रतिक्रिया

point

पोलिसांच्या चकमकीत नेमकं काय घडलं?

Naresh Mhaske On Akshay Shinde Encounter : बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षयचा एन्काऊंटर केला. पोलीस व्हॅनमध्ये असताना आरोपी अक्षय शिंदेने एका पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून थेट गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी सेल्फ डिफेन्समध्ये केलेल्या गोळीबारात अक्षय मारला गेला. परंतु, अक्षयच्या एन्काऊंटरमुळं राजकीय वातावरण तापलं असून विरोधक सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करत आहेत. याचा पार्श्वभूमीवर ठाण्याचे शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

हे वाचलं का?

नरेश म्हस्के अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरबाबत काय म्हणाले? 

बदलापूर अत्याचारातल्या आरोपीने पोलिसाची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. तीन पोलिस त्यात जखमी आहे. पोलिसांनी स्व संरक्षणासाठी गोळीबार केला आणि त्यात आरोपीचा मृत्यू झालाय. परंतु, विरोधक कुठलीही माहिती न घेता या घटनेवर प्रतिक्रिया देत सुटले आहेत. एन्काऊंटर की हत्या असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करणे हे दुर्दैव आहे. 

हे ही वाचा >> Badlapur Rape Case: कोण आहेत PI संजय शिंदे? ज्यांनी केला आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर

जखमी पोलीस अधिकाऱ्याच्या बाबतीत विरोधकांना काही घेणं देणं नाही, पण अक्षय शिंदे मारला गेला याचं त्यांना दुःख होतंय. विरोधकांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांचं मनोबल कायम रहावं, त्यांच्या पराक्रमाचं कौतुक व्हावं तसंच महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीशी आहे हे दाखविण्यासाठी आम्ही ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या पोलिसांची भेट घेतली.

आधी साडेचार वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेचे विरोधकांनी राजकारण केले. आता तो नराधम पोलिसांच्या चकमकीत मारला गेला तर त्यावरूनही राजकारण करताय. आता पोलिसांवर आरोप करणे ही दुटप्पीपणी हद्द झाली आहे. या आरोपीला भरचौकात फाशी द्या, अशी मागणी करणाऱ्यांना आता त्याच्याविषयी एवढी आपुलकी कशी वाढली ? असा सवालही नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! खात्यात 4500 जमा होणार की 1500? आदिती तटकरे काय म्हणाल्या?

कोण आहेत पोलीस निरीक्षक संजय शिंदे?

ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या एन्टी-एक्सटॉर्शन सेलमध्ये IPS प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केलं आहे. एनकाऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी 1983 मध्ये पोलीस दलात सामील होऊन आपल्या करिअरमध्ये 100 हून अधिक गुन्हेगारांचा एनकाऊंटर केला आहे. ज्या अधिकाऱ्यांनी गँगस्टर दाऊद इब्राहीमचा भाऊ इकबाल कासकरला अटक केली होती, त्या अधिकाऱ्यांसोबत संजय शिंदे यांनी काम केलं आहे. त्यांना महाराष्ट्र सरकारने गठीत केलेल्या विशेष तपास टीम (SIT) मध्ये सामील केलं होतं. ही टीम बदलापूर अत्याचार प्रकरणाचा तपास करत आहे. 
 

    follow whatsapp