शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात कार्यकर्त्यांना संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. याचसोबत 4 घोटाळ्यांची माहिती दिली आहे. हे घोटाळे नेमके काय आहेत? आणि आदित्य ठाकरे यांनी काय आरोप केले आहेत? हे जाणून घेऊयात.(aditya thackeray long march 4 allegation against shinde government bmc)
ADVERTISEMENT
आदित्य ठाकरे यांनी सुरुवातीला मुंबईत सुरु असलेल्या रस्ते घोटाळ्याची माहिती दिली. मुंबईत सगळे रस्ते कॉक्रिटीकरण, खड्डेमुक्त करणार होते. पण घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी कधीच कामाचा विचारच केला नाही. सांगितले एका रात्रीच जसे 40 लोक गुवाहाटीला पळाले तशी मुंबईची लुट करू, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली. तसेच यांचे पाच कॉन्ट्रॅक्टर मित्र आहेत, यासाठी बरोबर 5 लोकांसाठी पाच पाकिटे वाटली आहेत,असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.ऑगस्टमध्ये टेंडर काढलं, एकही मित्र आला नाही, म्हणून टेंडरच रद्द केले. त्यानंतर 5000 कोटीचे टेंडर 6 हजार 80 कोटींवर नेले. 40 टक्के फायदा कॉन्ट्रॅक्टरचा करून दिला, असा आरोप देखील आदित्य ठाकरेंनी केला.
तसेच ”तुम्हाला पप्पू चॅलेंज देतो, या अंगावर एकटे या किंवा पूर्ण फौजेला घेऊन या.आहे माझी तयारी माझ्या छातीवर वार करायला या, असे थेट आव्हानच आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारला दिले. तसेच 50 रस्त्यामधून एक सुद्धा रस्ता पुर्ण करता आला नाही. मुंबईसाठी काम करत आहात की खोके सरकारच्या दलालांसाठी काम करत आहात, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.
हे ही वाचा : ‘समृद्धीवर कोणी गेलं की लोकं म्हणतात देवेंद्रवासी झाला…’, शरद पवार असं का म्हणाले?
आदित्य ठाकरे यांनी स्ट्रीट फर्निचर हा दुसरा घोटाळाही समोर आणला. खोके सरकार 100 टक्के भ्रष्ट आहे.आतूनही भ्रष्ट, बाहेरून भ्रष्ट आहे. मला माहितीय यांच्या सभेला गर्दी होत नाही, मग खुर्च्या,बेंचेस कशाला घेताय? 40 हजार बेंचेस लावणार कुठे? 10 हजार कुंड्या घेतायत,या कुंड्यात काय लावणार हेच माहित नाही. हे सर्व वर्षभऱापासून होत आहे,अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
मुंबई महापालिकेच्या पैशातून कोणत्या 13 गोष्टी विकत घेणार आहात. 13 गोष्टी कोणत्या आहेत आणि त्याची रक्कम काय? ज्या गोष्टी 100 कोटीहून जास्त नसायला पाहिजे होत्या, त्या गोष्टी 263 कोटीला जातायत. हे आपलं दुर्भाग्य आहे. किती मोठा घोटाळा हे मुंबई महापालिकेत करत आहे. या घोटाळ्याचीही मी नोंद घेतली आहे. त्यामुळे तुम्हाला आत टाकणार म्हणजे टाकरणारच,असा इशाराच यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिला.
आदित्य ठाकरे यांनी पुढे चौथा घोटाळा सॅनिटरी पॅड वेंडींग मशीनचा बाहेर काढला. 5 हजार बाथरूम नसताना 5 हजार मशीन काढतात विकत घ्यायला. 23 हजाराचे मशीन 72 हजाराला विकत घ्यायचा प्रयत्न आहे तो अनिल परब यांनी विधानभवनात अडवून धरला आहे,असे देखील आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.महापालिकेत जे चाललंय ते योग्य नाही आहे. मुंबईच्या ठेवी 600 कोटी होत्या त्या 92 हजार कोटी पर्यंत आम्ही नेल्या. याला म्हणतात आर्थिक नियोजन.तसेच यांना दिल्लीसमोर कटोरा घेऊन उभे करायचे आहे, असा हल्लाबोल देखील आदित्य ठाकरे यांनी शिंदेंवर केला.
ADVERTISEMENT