Sanjay Raut : "जीवाला धोका निर्माण झाला, तरी...", घराच्या रेकी प्रकरणावरून खासदार संजय राऊत संतापले

मुंबई तक

• 05:30 PM • 20 Dec 2024

Sanjay Raut Press Conference: "तीन वर्षापूर्वी जेव्हा नवीन सरकार आलं होतं. त्यानंतर सर्व राजकीय विरोधकांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली. सरकार जरी बदललं असलं, तरी सर्वांची एकदाच सुरक्षा व्यवस्था काढणं, हा अत्यंत निर्घृण प्रकार आहे".

संजय राऊत

संजय राऊत (फाइल फोटो)

follow google news

बातम्या हायलाइट

point

घराजवळ अज्ञात इसमांनी रेकी केल्याचा राऊत कुटुंबीयांचा दावा

point

घराच्या रेकी प्रकरणावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं

point

पत्रकार परिषदेत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut Press Conference: "तीन वर्षापूर्वी जेव्हा नवीन सरकार आलं होतं. त्यानंतर सर्व राजकीय विरोधकांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली. सरकार जरी बदललं असलं, तरी सर्वांची एकदाच सुरक्षा व्यवस्था काढणं, हा अत्यंत निर्घृण प्रकार आहे. हा राजकीय सुडाचा प्रकार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी अशाप्रकारचा निर्णय कधी घेतला नव्हता. सामना हा कायम हिटलिस्टवर राहिलेला वृत्तपत्र आहे. माझ्याकडे 1991 सालापासून सामनाचा संपादक म्हणून मला सुरक्षा व्यवस्था राहिली. केंद्राकडून त्या संदर्भात काही सूचना होत्या. शिवसेनेचा नेता, खासदार म्हणूनही सुरक्षा व्यवस्था असते. पण देवेंद्र फडणवीस म्हणण्यापेक्षा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, पण गृहमंत्री फडणवीस होते. आम्ही राजकारणात आपल्यावर टीका करतो, आमच्या भूमिका मांडतो. म्हणून तुम्ही आम्हाला शत्रू समजता. शत्रू समजता म्हणून तुम्ही या टोकापर्यंत येता की, तुमच्या जीवाला धोका निर्माण झाला, तरी आम्हाला त्याची पर्वा नाही", अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिलीय. भांडूप येथील बंगल्याची दुचाकीवर आलेल्या दोन इसमांनी रेकी केल्यानंतर राऊतांनी सरकारला सुनावलं आहे. 

हे वाचलं का?

राऊत पुढे म्हणाले, "या महाराष्ट्रात अशाप्रकारचं राजकारण कधी झालं नाही. बाबा सिद्दीकी यांच्यासारख्या नेत्याची हत्या झाली. बीडमध्ये संतोष देशमुख या सरपंचाची हत्या झाली. परभणीत काही प्रकार घडले. महाराष्ट्रातलं वातावरण अधिक बिघडवण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत. देवेंद्र फडणवीस नक्षलवादी..नक्षलवादी अशी बोंब सकाळपासून मारत आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत नक्षलवादी होते. नक्षलवादी आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. नक्षलवाद्यांचा कार्यक्षेत्र वेगळा आहे आणि त्यांच बिमोड झालेला आहे, असं देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. पण नक्षलवाद्यांपेक्षाही तुमच्या सरकारच्या अवती भोवती जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांच्यापासून समाजाला जास्त धोका आहे. हे बीडच्या प्रकरणात दिसून आलं आहे".

हे ही वाचा >> CM Devendra Fadnavis : "संतोष देशमुख हत्या प्रकरणात मास्टरमाईंडच्या मुसक्या आवळणार..", सरकारने घेतले 'हे' मोठे निर्णय

सरकारमध्ये सामील झालेले आणि मुख्यमंत्र्यांच्या सभोवती असलेले, गृहमंत्र्यांच्या, उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर असलेले काही असे फोर्सेस आहे, ज्यांच्यामुळे या राज्याची कायदा सुव्यवस्था आणि समाज व्यवस्था पूर्ण बिघडते. पण बहुतेक या राज्यातल्या शासन प्रमुखांची अशी इच्छा दिसते, जे आमच्या विरोधात बोलत आहेत किंवा आम्हाला विरोध करत आहेत, त्यांना गुंड टोळ्यांपासून जर काही त्रास झाला, तर त्याला सरकारची मूकसमंती दिसते. असं मला राज्यातील घटनांवरून दिसतंय. आमच्या घरावर पाळत ठेवताय, हे प्रकरण आमच्यासाठी नवीन नाही. आम्हाला मारण्याचा प्रयत्न अनेकदा झाला, हे ही आमच्यासाठी नवीन नाही. पण केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारची वृत्ती मी समोर आणलीय, असंही राऊत म्हणाले.

हे ही वाचा >>  Kalyan Marathi Family: 'मराठी लोक भिकारडे...', परप्रांतीयाची मराठी कुटुंबाला हिणवत तुफान मारहाण

    follow whatsapp