‘CM शिंदेंसह आमदार अपात्र ठरतील, म्हणून….’, संजय राऊतांचं मोठं विधान

मुंबई तक

02 Jul 2023 (अपडेटेड: 02 Jul 2023, 11:10 AM)

राज्यपाल रमेश बैस यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची तर इतर 9 मंत्र्यांना मंत्री पदाची शपथ दिली आहे. या फुटीनंतर आता राज्यात शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी फुटली आहे. या सर्व घडामोडींवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे

shivsena ubt sanjay raut reaction on ajit pawar and ncps 9 mlas oath ceremony governor ramesh bais

shivsena ubt sanjay raut reaction on ajit pawar and ncps 9 mlas oath ceremony governor ramesh bais

follow google news

Maharashtr latest Political News : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची तर इतर 9 मंत्र्यांना मंत्री पदाची शपथ दिली आहे. या फुटीनंतर आता राज्यात शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी फुटली आहे. या सर्व घडामोडींवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. येत्या काही दिवसात अपात्रतेबाबत निर्णय येऊ शकतो. आणि मुख्यमंत्री शिंदेसोबतचे आमदार अपात्र ठरतील त्यासाठी भाजपाने ही पर्यायी व्यवस्था केल्याची टीका संजय राऊत यांनी यावर केली आहे. (shivsena ubt sanjay raut reaction on ajit pawar and ncps 9 mlas oath ceremony governor ramesh bais)

हे वाचलं का?

राजकारणात ज्या घटना घडणार होत्या, त्या घडल्या आहेत. आताच अजित पवार यांच्यासोबतच्या लोकांनी शपथ घेतल्याचे आम्ही पाहिले आहे, अशी माहिती देत संजय राऊत म्हणाले की, सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार हे अस्थिर आहे. 165 -170 आमदारांचा पाठिंब्याचे सरकारला अजित पवार यांच्या 30 ते 35 आमदारांच्या पाठिंब्याची गरज भासते. याचा अर्थ मी असा काढतो की, सर्वोच्च न्यायालयाने शिंदेंच्या फुटीर गटाबाबत जो निर्णय दिला आहे, आमदार अपात्र आहे, बेकायदेशीर आहे. त्यामुळे लवकरच एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्यासह 16 आमदार व नंतर उरलेल्या आमदार अपात्र ठरतील म्हणूनच अजित पवारांच्या रूपात नवीन टेकू घेतल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.

मुख्यमंत्री शिंदे फार काळ मुख्यमंत्री पदावर राहणार नाही आणि त्यांचे आमदार अपात्र ठरतील हे आजच्या शपथविधीने स्पष्ट होत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री शिंदेसह इतर नेते हे अपात्रच ठरतील, कोणताही कायदा, कोणतीही पळवाट त्यांना वाचवू शकत नाहीस, त्यामुळे राज्य़ाला नवीन मुख्यमंत्री मिळू शकतो. महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळेल हे भाकित नसून परखड मत असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले आहे.

अजित पवार यांच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी डबल इंजिनला ट्रिपल इंजिन जोडल्याची प्रतिक्रिया दिली होती. पण यातले एक इंजिन बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने दुसरं इंजिन लावल्याचा टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

अजित पवारांसोबत गेलेले अनेक नेते आहेत, ज्यांच्याबाबत भाजपने मोहीम राबवली होती, त्यांच्याबाबत भाजप काय करणार हा प्रश्न आहे. तसेच त्या संदर्भात भाजपचे पोपटलाल आणि केंद्रीय यंत्रणांनी उत्तर द्यायला हवं. ज्यांच्या तुरुंगवासासाठी दरवाजे उघडले होते, त्यांना मंत्री पदाची शपथ घेतल्यावर भाजप कोणती भूमिका घेणार असा सवाल देखील राऊत यांनी उपस्थित केला आहे.

शरद पवार यांना या संपूर्ण घटनेची पक्की माहीती होती, असे देखील संजय राऊत यांनी सांगितले आहे. याचसोबत माझी शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली आहे, ते खंबीर आहेत. पवार साहेब, उद्धव ठाकरे आम्ही सगळे महाराष्ट्रात उभे राहून भविष्यात एकत्र निवडणूक लढवू. महाराष्ट्रात महाविकास आघाडी उभी करू, असा विश्वास देखील संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

    follow whatsapp