Shivaji Maharaj: परवानगी फक्त 6 फुटाच्या पुतळ्याला, अचानक कोणी वाढवली महाराजांच्या पुतळ्याची उंची?

मुंबई तक

29 Aug 2024 (अपडेटेड: 29 Aug 2024, 07:59 PM)

सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर जो शिवाजी महाराजांचा जो पुतळा होता तो केवळ 6 फुटांचा असायला हवा होता. कारण कला संचलनालयाकडून केवळ तेवढ्याच उंचीच्या पुतळ्याला परवानगी देण्यात आली होती.

अचानक कोणी वाढवली शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची?

अचानक कोणी वाढवली शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची?

follow google news

बातम्या हायलाइट

point

सिंधुदुर्गातील शिवाजी महाराजांचा पुतळ्याबाबत नवनव्या गोष्टी समोर

point

कला संचलनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी केला प्रचंड मोठा खुलासा

point

कला संचलनालयाकडून फक्त 6 फूट उंचीच्या पुतळ्याला देण्यात आलेली परवानगी

मुंबई: सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा जो पुतळा कोसळल्यानंतर आता या सगळ्याच प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे हे केले जात आहेत. आता कला संचलनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी एक प्रचंड मोठा खुलासा केला. ज्यामुळे पुतळा प्रकरणात नेमकं काय घडलं याबाबत आता अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. (sindhudurg rajkot only a 6 foot statue was allowed by directorate of art who exactly increased the height of shivaji maharaj statue)

हे वाचलं का?

महाराष्ट्रात कोणत्याही महापुरुषाचा पुतळा उभारण्याआधी त्याला कला संचलनालयाची परवानगी ही अत्यंत आवश्यक असते. जेव्हा राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत शिल्पकार जयदीप आपटेने कला संचलनालयाची परवानगी मागितली त्यावेळी संचलनालयाने त्याला केवळ 6 फुटाच्या पुतळ्याची परवानगी देण्यात आली होती.

हे ही वाचा>> Shivaji Maharaj Statue: शिंदे सरकारचं डॅमेज कंट्रोल सुरू, 'वर्षा'वरच्या 'त्या' बैठकीतील Inside स्टोरी

राज्य कला संचलनालयाचे सचिव राजीव मिश्रा यांनी टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा करताना सांगितलं की, कला संचलनालयाने राजकोट किल्ल्यावर केवळ 6 फुटाच्या पुतळ्याची परवानगी दिली होती. मात्र, शिल्पकाराने आम्हाला अंधारात ठेवत पुतळ्याची उंची वाढवली.

कला संचलनालयाचा मोठा खुलासा... 

राजीव मिश्रा यांनी मुलाखतीत म्हटलं की, 'कोणतेही महापुरुष आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबतीत आपल्या महाराष्ट्रात एक जीआर आहे, धोरण आहे की, कुठल्याही पुतळ्याला परवानगी ही कला संचलनालयाकडून घ्यावीच लागते. नाहीतर पुतळा उभारता येत नाही.' 

'पद्धत अशी आहे की, कुठलीही संस्था ही आमच्याकडे अर्ज करते, प्रस्ताव देते तर त्या संस्थेचा जो शिल्पकार असतो तो एक क्ले मॉडेल तयार करतो. राजकोटवरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत देखील 6 फुटाचा क्ले मॉडेल शिल्पकाराने आमच्यासमोर प्रस्तुत केला होता.'

'कला संचलनालयाकडे एक समिती असते ज्यामध्ये अनेक तज्ज्ञ मंडळी असतात. ती मंडळी पुतळा नेमका कोणाचा आहे याची पाहणी करतात. दुसरी गोष्ट म्हणजे याबाबतीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे की नाही हे बघितलं जातं. याशिवाय चेहऱ्यावरचे भाव, पुतळ्यातील शरीररचना या सगळ्याचा अभ्यास केला जातो. त्यानंतर क्ले मॉडेलला मान्यता दिली जाते.'

'क्ले मॉडेलला मान्यता मिळाल्यानंतर शिल्पकार शिल्प कशा पद्धतीने घडवतो ती त्याची जबाबदारी असते.' 

'शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत असं झालं की, त्यांनी क्ले मॉडेलला मान्यता घेतली. आमच्याकडून नौदलाला मान्यता देण्यात आली. ज्यावेळी मान्यता देण्यात आली तेव्हा आम्हाला हे सांगण्यात आलं नव्हतं की, हा पुतळा 35 फुटाचा असेल. तसंच त्यात हे लोकं स्टेनलेस स्टील वापरणार आहेत हे देखील सांगितलं नव्हतं.'

हे ही वाचा>> Devendra Fadnavis: "नारायण राणे कुणाला धमक्या..."; राजकोटच्या राड्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस कडाडले

'जेव्हा-जेव्हा त्यांना हे बदल करायचे होते तेव्हा त्यांनी आम्हाला माहिती न द्यायला हवी होती. पण ती दिली गेली नाही. पण याविरोधात कोणतीही तरतूद नाही.' 

'कोणत्याही पुतळ्याला मान्यता देताना त्याच्या चौथऱ्याची देखील मान्यता ही चीफ आर्किटेक्ट पीडब्ल्यूडीकडून दिली जाते. ही मान्यता मिळाल्यानंतरच आम्ही पुतळ्याच्या मान्यतेचे पत्र आम्ही शिल्पकाराला देतो.' 

'कलाकाराची जबाबदारी असते की, कुठलं मटेरियल वापरावं, कोणत्या स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टीफिकेट घ्यावं आणि नंतरच निर्णय घेऊन पुतळा करावा.' 

'जेव्हा शिल्पकाराकडे हे काम देण्यात आलं तेव्हा त्या ज्या एजन्सीने त्यांना उंची आणि मटेरियल ठरविण्याचा निर्णय दिला. त्या कमिटीमध्ये शिल्पकाराने सांगायला हवं होतं की, मी पुतळा 35 फुटाचा उभारणार आहे. तेव्हा मला तांत्रिक मदतीची गरज लागेल. पण या गोष्टी त्याने केल्या नसाव्यात म्हणून ही घटना घडली.' 

'पुतळ्याच्या नट बोल्टला गंज लागला आहे याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नव्हती आणि आम्हाला काही कळविण्यात देखील आलं नव्हतं. मला असं वाटतं, आमच्याकडे कोणी मार्गदर्शनासाठी आलं असतं तर आम्ही नक्कीच त्यांना मदत केली असती.' 

'मात्र, 6 फुटाच्या क्ले मॉडेलला जेव्हा आम्ही मान्यता देतो त्यानंतर ते पुतळा किती फुटाचा करतात आणि मटेरिअल कोणतं वापरतात त्याबाबत आम्हाला कोणतीही माहिती दिली जात नाही. त्यावर आम्हाला काही बोलताही येत नाही.' 

'मला असं वाटतं की, शिल्पकारावर वेळेचा दबाव असेल  आणि त्यांना लवकरात लवकर पुतळा बनवायचा असेल.. त्या घाई-गडबडीत त्यांनी पुतळा बनवताना नीट लक्ष दिलं नसेल म्हणून ही घटना घडलं असेल.'

'जर त्यांनी ऐनवेळी पुतळ्याचं मॉडेल शेवटच्या क्षणी बदललं असेल तर हे खूपच गंभीर आहे. पण त्याविषयी आम्हाला माहिती नाही. ज्या मॉडेलला आम्ही मान्यता दिली तेच त्यांनी बनवणं अपेक्षित होतं. त्यामध्ये त्यांनी बदल केला असेल तर त्यांनी ते कला संचलनालयाकडे पुन्हा येऊन कळवणं गरजेचं होतं. मात्र, शिल्पकाराने स्वत:च निर्णय घेतला असेल तर याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही.' अशी सविस्तर माहिती राजीव मिश्रा यांनी यावेळी दिली.
 

    follow whatsapp