Sanjay Raut: 'मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, शिवरायांचा असा अपमान मुघलांनीही केला नाही', संजय राऊत संतापले!

रोहिणी ठोंबरे

27 Aug 2024 (अपडेटेड: 27 Aug 2024, 03:16 PM)

Shivaji Maharaj statue collapsed : सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा साधारण 9 महिन्यांपूर्वी उभारण्यात आला होता. जो सोमवारी (26 ऑगस्ट) सकाळच्या सुमारास अचानक कोसळला. दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर आरोप-प्रत्यारोप देखील सुरू झाले आहेत.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

ज्यांचे शिवाजी महाराज लाडके होऊ शकले नाहीत, ते...- संजय राऊत 

point

संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

point

'हवा त्यांच्या डोक्यात गेलीये', संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Sanjay Raut On Shivaji Maharaj statue collapsed : सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा साधारण 9 महिन्यांपूर्वी उभारण्यात आला होता. जो सोमवारी (26 ऑगस्ट) सकाळच्या सुमारास अचानक कोसळला. दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर आरोप-प्रत्यारोप देखील सुरू झाले आहेत. हा पुतळा नेमका कोणी उभारला होता? यावरून बरेच आरोप झाले. विरोधकांनी या मुद्द्यावरून शिंदे सरकारला बरंच घेरलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही आता सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. महाविकास आघाडीने महायुतीला धारेवर धरलं असून संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. (sindhudurga chhatrapati shivaji maharaj statue collapse issue sanjay raut demands cm eknath shinde should resign )

हे वाचलं का?

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

'शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याचं चित्र मराठी मनाला विचलीत करणारे आहे. पंतप्रधान मोदींनी पुतळ्याचं अनावरण केलं. श्रेयघेण्याची घाई, निवडणुकांचे राजकारण आणि राष्ट्रीयकामात खाऊबाजीयामुळेच हे घडले. गद्दारांचे दिल्लीश्वर पुतळ्याची प्रतिष्ठापना करतात हे शिवरायानीच झिडकारले.' असं संजय राऊतांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

हेही वाचा : Maharashtra weather: बाई... हा काय प्रकार? केवढा तो पाऊस, पुढील 48 तास राज्यासाठी धोक्याचे!

ज्यांचे शिवाजी महाराज लाडके होऊ शकले नाहीत, ते...- संजय राऊत 

माध्यमांसमोर बोलताना संजय राऊत म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अपमान मुघलांनीही कधी केला नव्हता. 1956 साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी प्रतापगडावर छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवला, तिथेही हवा आहे, मात्र तो पुतळा अजूनही त्याच स्थितीत मजबूत आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर गद्दारांच्या सरकारने बांधलेला पुतळा आठ महिन्यात कोसळला. कारण तो चांगल्या मनाने नाही, तर राजकीय मनाने बांधला होता. 

हेही वाचा : Dahi Handi: 'गोविंदा आला रे आला'; मुंबई-ठाण्यातील 'या' भागांमध्ये दहीहंडीचे लागणार सर्वात उंच थर! 

तुम्ही महाराष्ट्राच्या भावनांशी खेळलात, सर्वात आधी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करतो. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना बरखास्त करायला हवं. त्यांनी शिवरायांनाही सोडलं नाही. सरकार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामातही लाखो कोटी रुपयांचा घोटाळा केला. आपापल्या लोकांना टेंडर आणि कामं दिली. ज्यांचे शिवाजी महाराज लाडके होऊ शकले नाहीत, ते लाडक्या बहिणींच्या गोष्टी करत आहेत. पण महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही. महाविकास आघाडी यावर गांभीर्याने विचार करत आहे," अशा शब्दात संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला.

'हवा त्यांच्या डोक्यात गेलीये', संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

"मुख्यमंत्री म्हणतात की तिथे हवा जास्त आहे, पण तिथे हवा जास्त नाहीये तर हवा त्यांच्या डोक्यात गेलीये, म्हणून ते जमिनीपासून वर उडत आहेत. नरेंद्र मोदी विश्वगुरु झाले, पण शिवराय तर विश्वपुरुष होते. नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग किल्ल्यावर नौदलाच्या कार्यक्रमात पुतळ्याच्या अनावरणासाठी आले होते. घाई गडबडीत लोकसभा निवडणुकांआधी अनावरण करण्यात आलं. कारण श्रेयवादाची लढाई होती. शिवरायांचे वंशज असलेले कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी घाई करु नका, असंही सांगितलं होतं.

हेही वाचा : Ladki Bahin Yojana : 'हे' काम आताच करून घ्या, नाहीतर योजनेचे 4500 गमावून बसाल!

पुतळा बनवणारा त्यांच्या ठाणे गावचा होता. या घटनेने महाराष्ट्रावर मोठा आघात झालाय, असं चित्र आपल्या डोळ्यासमोर, शिवरायांच्याच किल्ल्यावर बघायला मिळेल, असं वाटलं नव्हतं." असे संजय राऊत म्हणाले.
 

    follow whatsapp