Nilesh Rane: रितेश देसाई, सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील संपूर्ण राजकारण ढवळून निघालं आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर शिवसेना (UBT) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांसह आज (28 ऑगस्ट) राजकोट किल्ल्यावर घटनास्थळी पाहणीसाठी गेले होते. पण त्याचवेळी ठाकरे आणि राणे समर्थक अचानक आमनेसामने येताच किल्ल्यातच राडा झाला. यावेळी नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश हे देखील प्रचंड आक्रमक झाल्याचं दिसून आलं. (sindhudurga rajkot chhatrapati shivaji maharajhe statue has come to our area what did nilesh rane say to police who blocked aaditya thackerays way)
ADVERTISEMENT
आदित्य ठाकरे हे राजकोट येथे राजकारण करण्यासाठी आले आहेत असा आरोप राणे पिता-पुत्रांनी केला. त्याचवेळी समर्थकांमध्ये जोरदार झटापट देखील झाली. ज्यानंतर निलेश राणेंनी आपण मागे हटणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे सिंधुदुर्गतील राजकोटवर तणाव निर्माण झाला होता.
'तो आमच्या एरियात आलाय...', निलेश राणे पोलिसांना काय म्हणाले?
दरम्यान, हे सगळं प्रकरण अधिक चिघळू नये यासाठी सिंधुदुर्ग पोलीस हे प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलीस हे दोन्ही बाजूकडील लोकांना समजविण्याचा प्रयत्न करत होते.
त्याचवेळी निलेश राणे थेट पोलिसांनाच म्हणाले की, 'आम्हाल विनंती करूच नका.. त्यांना बाहेर घेऊन जा.. आम्ही दिवसभर जाणार नाही.. तुम्ही आम्हाला ओळखता ना.. आम्ही दिवसभर जाणार नाही. तो (आदित्य ठाकरे) आमच्या एरियात आलाय... आम्ही त्याच्या अंगावर गेलो नाही.. दुसऱ्या दरवाजाने त्याला घेऊन जा.. एंट्री पहिली आमची झालीए.' असं म्हणत निलेश राणेंनी मुख्य द्वारातून बाहेर जाण्यास मनाई केली होती.
पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आदित्य ठाकरे किल्ल्याच्या मुख्य द्वारातूनच पडले बाहेर
दरम्यान, सिंधुदुर्ग पोलिसांनी मध्यस्थीनंतर केल्यानंतर आदित्य ठाकरे हे राजकोट किल्ल्याच्या मुख्य द्वारातूनच बाहेर पडले. पण त्यावेळी देखील नारायण राणे आणि निलेश राणे हे बाजूला आपल्या समर्थकांसह उभे होते. तेव्हा इथे दोन्हीकडून बाजूने मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही झाली.
ADVERTISEMENT