Solapur News: काही दिवसांपूर्वी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर धनगर आरक्षण (Dhangar reservation) प्रकरणी त्यांच्या अंगावर शेखर बंगाळे यांनी त्यांच्यावर भंडाला उधळला होता. त्यानंतर आज पु्न्हा एकदा अशी घटना घडली आहे. सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) रविवारी सोलापूर दौऱ्यावर आले असताना त्यांच्यावर शाई फेक करण्यात आली. या घटनेनंतर त्या ठिकाणी प्रचंड गोंधळ उडाला.
ADVERTISEMENT
खासगीकरणाचा रोष
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतर त्या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. शासकीय नोकरभरतीचे खासगीकरण करण्याच्या धोरणाच्या निषेधार्थ त्यांच्या अंगावर निळी शाई फेकण्यात आली आहे.
हे ही वाचा >> खरी राष्ट्रवादी कोण, याचा निकाल तुमच्या बाजूने होईल; सुनावणीआधी शरद पवारांचं विधान
विश्रामगृहाच्या परिसरात तणाव
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक करण्यात आल्यानंतर ज्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचे नाव अजय मैंदर्गीकर असून तो भीमा इर्मी संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले. शाई फेक करण्यात आल्यामुळे शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात तणाव पसरला होता.
पोलिसांची मोठी तारांबळ
चंद्रकांत पाटील यांचे रात्री सात रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहात आगमन झाले होते. त्यावेळी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. मात्र हा प्रकार घडल्याने मोठा गोंधळ उडाला. यावेळी कसून चौकशी करण्यात आली होती, तरीही हा प्रकार घडल्याने पोलिसांची मोठी तारांबळ उडाली.
हे ही वाचा >> बॉयफ्रेंडचा तिला पाहायचा होता लाईव्ह मर्डर, हत्येनंतर गोव्यात होती पार्टी
भाजपविरोधात घोषणाबाजी
याआधी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळण्यात आला होता. आता चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल हा प्रकार घडल्याने भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT