राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला नॅचरल करप्ट पार्टी म्हणता, मग महाराष्ट्रात राष्ट्रवादीला कॉग्रेसला सत्तेत का घेतलं असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत भाजपला केला आहे. यावर भाजपाने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी केली आहे. (supriya sule slams bjp on sansad if ncp is naturally corrupt party then why did ncp come to power in maharashtra)
ADVERTISEMENT
संसदेत आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी घराणेशाही आणि राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातील सत्तेवर आक्रमक भूमिका मांडली. माझ्याच मतदार संघात य़ेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नॅचरली करप्ट पार्टी असल्याचे हे म्हणतात, मग महाराष्ट्रात यांनी राष्ट्रवादीला सत्तेल का घेतलं? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी भाजपला केला आहे. भाजपने यावर मला स्पष्टीकरण दिले पाहिजे अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.
हे ही वाचा : ‘जगेन अन् मरेन, पण…’; शंभुराजेंनी डिवचताच भास्कर जाधवांचा सुटला संयम
सुप्रिया सुळे यांनी घराणेशाहीवरही भाजपला सुनावले आहे. मी स्वत: घराणेशाहीची प्रोडक्ट आहे.मला याचा अभिमान आहे. मी प्रतिभा शरद पवारची मुलगी आहे, मला याचा अभिमान आहे.आमच्या कुटुंबात मेरीट आहेच नाही. पण ज्यावेळेस एनडीएची बैठक होते.जी. के. वासान, चिराग पासवान, प्रफुल पटेल,दुष्यंत चौटाला हे सगळे मेरीट सांगणारे नाही आहेत का? तुमच्याबरोबर असले की मेरीट आणि आमच्याबरोबर असले की घराणेशाही सागणारे, असं कस चालेलं, हा आमच्यावर अन्याय होतोय्, असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच यांचे आमदार, खासदार, मंत्री, पहिली, दुसरी, तिसरी पिढी तिकडे जाते. आम्ही गेलो तर त्रास होतो, अशा शब्दात देखील सुप्रिया सुळे यांनी भाजपला सुनावले आहे.
भाजप म्हणते 2014 आणि 2019 मध्ये आम्हाला डंकेच्या चोटवर जनादेश मिळाला.त्यामुळे लोकशाही आहे तुम्ही जिंकलात ही चांगली गोष्ट आहे. मग केजरीवालांना एक नियम आणि तुम्हाला एक नियम का? असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. दिल्लीच्या जनतेने जर अरविंद केजरीवाल यांना कौल दिला आहे, तर तो चुकीचा आणि भाजपला दिला तो बरोबर, हा कुठला न्याय आहे असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. अरविंद केजरीवालांना दिल्ली ही मिळाली आणि पंजाबही मिळाला, जनतेने त्यांना कौल दिला आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
ADVERTISEMENT