Survey: शिंदे गेले, तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून कोण हवं?

मुंबई तक

• 01:00 PM • 01 May 2023

जर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद गमावलं तर त्याऐवजी महाराष्ट्रातील जनतेला मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल याबाबत नुकताच एक सर्व्हे करण्यात आला आहे. जाणून घ्या त्याविषयी सविस्तर.

survey if eknath shinde leaves the post of cm who will become the chief minister of maharashtra

survey if eknath shinde leaves the post of cm who will become the chief minister of maharashtra

follow google news

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दहा महिन्यांतच जाणार, जाणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. अशातच भावी मुख्यमंत्री (Chief Minister) म्हणून महाराष्ट्रभर बॅनरबाजीही सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadnavis) अजित पवारांच्या (Ajit Pawar) समर्थकांमध्ये चढाओढ लागली आहे. राष्ट्रवादीत बंडाची चर्चा आहेच. याच सगळ्या चर्चांवर महाराष्ट्राच्या मनात काय? शिंदे गेले, तर मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला कोण हवं, अजित पवार, देवेंद्र फडणवीस की आणखी कुणी? याबद्दलच आता आपण सविस्तर जाणून घेऊया. (survey if eknath shinde leaves the post of cm who will become the chief minister of maharashtra)

हे वाचलं का?

ठाकरे सरकार आल्यापासूनच महाराष्ट्राच्या राजकारणात रोज हायवोल्टेज ड्रामा बघायला मिळतोय. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री होऊन दहा महिने होत नाही, तेच आता त्यांच्या पायउतार होण्याचीही चर्चा सुरू झाली आहे. सत्तासंघर्षाच्या निकालाच्या तोंडावर या सगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. दुसरीकडे सुप्रीम कोर्टानं आमदारांना अपात्र ठरवल्यास शिंदेंचं मुख्यमंत्रिपद जाईल. नवं सरकार येईल. अशावेळी शिंदे गेल्यावर मुख्यमंत्री बनण्यासाठी, बनवण्यासाठी नेते, समर्थकांमध्येही पडद्याआड, पडद्यावर मोर्चेबांधणी सुरू असल्याचं दिसतं आहे.

हे ही वाचा>> ‘गौतमीचा कार्यक्रम ठेऊन अजित पवारांना….’,अब्दुल सत्तार यांच्या कानपिचक्या

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री असल्याचे बॅनर नागपुरात झळकले. तसेच बॅनर अजित पवारांच्या समर्थकांनी महाराष्ट्रभर ठिकठिकाणी लावले. एवढंच नाही, तर स्वतः अजित पवारांनी 2024 ला नाही, तर आतापण मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असं विधान केलं. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी तर जाहीर कार्यक्रमात जयंत पाटलांसारखा सुसंस्कृत व्यक्ती मुख्यमंत्री हवा, असं म्हटल्यानं या चर्चांना आणखी हवा मिळाली. पण या सगळ्यात आता जनतेला मुख्यमंत्री म्हणून फडणवीस, पवार, पाटील हवेत की आणि कोण याचं उत्तर समोर आलं आहे.

सर्व्हेनुसार, महाराष्ट्रातील जनतेने काय दिलाय कौल?

सर्वेक्षण संस्था सी वोटरने एबीपी नेटवर्कसाठी सर्व्हे केला. सोमवारी 24 एप्रिल ते बुधवारी 26 एप्रिल या तीन दिवसांत हा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये शिंदे पायउतार झाल्यास महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण या प्रश्नावर लोकांनी आपला कौल दिला.

यामध्ये 26 टक्के लोकांना देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदी बघायचं किंवा होतील असं वाटतं आहे. तर अजित पवार 11 टक्के लोकांची पसंती आहे. पण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुन्हा मुख्यमंत्री होतील असं म्हणणाऱ्यांची संख्या सर्वाधिक 28 टक्के आहे. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणून 35 टक्के लोक असे आहेत, की ज्यांना नवा मुख्यमंत्री कोण होईल, याची माहिती नाही.

हे ही वाचा>> ”उद्धव ठाकरेंना राजकीय लव्ह जिहाद झालाय”,नितेश राणेंची टीका

या सर्वेक्षणातून एक गोष्ट प्रकर्षानं समोर आली आहे, ती म्हणजे अजूनही सर्वाधिक 28 टक्के लोकांना उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असं वाटतंय. शिवसेनेत फाटाफूट झाली असली, तर ठाकरेंच्या लोकप्रियतेला फार धक्का बसल्याचं दिसतं नाही. ठाकरेंसाठी सहानुभुतीचा फॅक्टर काम करतोय, असं म्हटलं जात होतं. तीच गोष्ट सर्वेक्षणातही दिसतेय.

    follow whatsapp