धाराशीवमध्ये तानाजी सावंत गट आणि महाविकास आघाडीत तुफान राडा

मुंबई तक

25 May 2023 (अपडेटेड: 25 May 2023, 10:40 AM)

Tanaji Sawant group and Maha Vikas Aghadi group Clashes Together : धाराशिव जिल्ह्यातील परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीपूर्वी मंत्री तानाजी सावंत गट आणि महाविकास आघाडीत तुफान राडा झाल्याची घटना घडलीय. या घटनेत मंत्री डॉ तानाजी सावंत गटाचे कार्यकर्ते सुरेश उर्फ सूर्यकांत कांबळे यांच्यासह 30-35 जणावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

tanaji Sawant group and maha vikas aghadi group clashes together paranda bazar samiti election dharashiv

tanaji Sawant group and maha vikas aghadi group clashes together paranda bazar samiti election dharashiv

follow google news

Tanaji Sawant group and Maha Vikas Aghadi group Clashes Together : धाराशिव जिल्ह्यातील परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Paranda bazar samiti) सभापती व उपसभापती निवडीपूर्वी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) गट आणि महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) तुफान राडा झाल्याची घटना घडलीय. या घटनेत महाविकास आघाडीच्या संचालकांचे अपहरण करुन जबर मारहाण केल्याप्रकरणी मंत्री डॉ तानाजी सावंत गटाचे कार्यकर्ते सुरेश उर्फ सूर्यकांत कांबळे यांच्यासह 30-35 जणावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेने परीसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी (Police) सौम्य लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणली.(tanaji Sawant group and maha vikas aghadi group clashes together paranda bazar samiti election)

हे वाचलं का?

प्रकरण काय?

उजनी येथील विश्रामगृहात जयकुमार जैन यांच्यासह सुजित देवकते, रवींद्र जगताप, संजय पवार, दादा घोगरे, सोमनाथ शीरसाठ, शंकर जाधव, हरी नलवडे या 8 संचालकासह हरिश्चंद्र मिस्कीन, किरण शिंदे, सुदाम देशमुख व शरद झोंबाडे अशी मंडळी मुक्कामी होती. या दरम्यान सुरेश कांबळे व त्यांच्या साथीदारांनी शासकीय विश्रामगृहाच्या खिडकीच्या काचा व दरवाजा फोडून नुकसान केले. यानंतर ‘गाडीत बसा’, ‘तुम्हाला मस्ती आलीय’. ‘सभापती उपसभापती पदाच्या निवडणूकीत आम्हाला मतदान करा’, ‘आमची सत्ता आहे’, ‘आमचे कोणी वाकडे करू शकत नाही” अशी दमदाटी केली. यासोबतच सुरेश कांबळे व त्यांच्या साथीदारांनी लोखंडी कुकरी, लाकडी दांड्याने मारहाण केल्याचा आरोप जैन यांनी केला.

पिस्तुलीचा धाक दाखवला…

मारहानीनंतर बळजबरीने सर्वांना गाडीत बसवून टेम्भूर्णी बायपास रोडने पंढरपूरला नेले. त्यानंतर मिरज येथील अज्ञातस्थळी सोडताना सुरेश कांबळे यांनी आमच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली. यासोबत जीवे सोडणार नाही, तुमच्या बरोबर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांना देखील जीवंत सोडणार नाही अशी दमदाटी करून पिस्तूलीचा धाक दाखविल्याचा आरोप जैन यांनी केला. तानाजी सावंत गट व महाविकास आघाडीचा गट एकमेकांसोबत भिडल्यानंतर तणावपुर्ण स्थिती निर्माण झाली होती. यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणली होती.

पोलिसांत गुन्हा दाखलं

या प्रकरणी जयकुमार जैन यांनी सोलापूर जिल्ह्यातील टेम्भूर्णी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीत त्यांनी सुरेश उर्फ सूर्यकांत कांबळे, गणेश जगदाळे, प्रदीप पाडुळे, प्रशांत शिंदे, समाधान मिस्कीन, किरण उर्फ लादेन बरकडे, जगदीश ठवरे पाटील यांच्यासह इतर 30 ते 35 जणांनी मारहाण, अपहरण व पिस्तुलबाजी करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली. या तक्रारीनुसार टेम्भुर्णी पोलिस ठाण्यात गुरन 337/2023 भादवि कलम 327,326, 324,363,365,323,143,147,149,452,504,506, सह आर्म ॲक्ट कलम 3,25 व सार्वजनिक संपत्ती आणि प्रतिबंध अधिनियम 1984 चे 3 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर करीत आहेत.

आरोप-प्रत्यारोप काय आहेत ?

मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचे सुरेश कांबळे हे समर्थक आहेत.त्यामुळे सावंत यांच्या सूचनेनुसार कांबळे यांनी बिहारप्रमाणे फिल्मी स्टाईलने हा प्रकार केल्याचा आरोप माजी आमदार राहुल मोटे यांनी केला आहे. त्यामुळे कांबळेसह सर्व आरोपींना अटक न केल्यास धाराशिव जिल्हा बंदचा इशारा माजी आमदार पाटील व मोटे यांनी दिला आहे. तसेच मंत्री सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली आहे. या संपुर्ण प्रकरणावर आता सावंत यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. या घटनेशी आपला कोणताही संबंध नाही, आम्ही कोणलाही पळविले नाही, त्यामुळे विरोधकांनी केलेले सर्व आरोप तानाजी सावंत यांनी फेटाळले आहेत. तसेच आम्ही अर्जही दाखल केला नाही अशी भुमिका सावंत यांनी मांडली आहे.

परंडा बाजार समितीचा निकाल काय?

परंडा बाजार समितीत 18 जागापैकी 13 जागा या महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या तर, 5 जागा भाजप शिवसेना शिंदे गट यांच्या ताब्यात आहेत. दरम्यान दोन्ही गटातील राड्यानंतर आता परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली.

    follow whatsapp