‘2014 पासून देशाच्या पाठीमागे ‘पनौती’…’ ठाकरेंचा सामनातून PM मोदींवर हल्लाबोल

राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना ‘पनौती’ म्हटले व ‘पनौती’ शब्दाचे विश्लेषण केले. ‘पनौती’ म्हणजे नकारात्मक व्यक्ती किंवा संकटकाल. भाजप ज्यास अमृतकाल वगैरे म्हणत आहे तो संकटकाल आहे व त्याचा पनौतीशी संबंध आहे.

thackeray criticize pm narendra modi on panouti word saamna editorial maharashtra politics

thackeray criticize pm narendra modi on panouti word saamna editorial maharashtra politics

प्रशांत गोमाणे

25 Nov 2023 (अपडेटेड: 25 Nov 2023, 04:39 AM)

follow google news

Thackeray Saamna editorial Pm Narendra Modi : आयसीसी वर्ल्ड कप 2023च्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव केला. या पराभवानंतर सोशल मीडियावर पनौती हॅशटॅग ट्रेंड झाला होता. या दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi)  यांचा उल्लेख ‘पनौती’ असा केला होता. या मुद्यावरून आता राजकारण तापले असताना ठाकरे गटाच्या सामना अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताशेरे ओढण्यात आले आहेत आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची पाठराखण करण्यात आली आहे. त्यामुळे नेमकं अग्रलेखात काय आहे? ते जाणून घेऊयात. (thackeray criticize pm narendra modi on panouti word saamna editorial maharashtra politics)

हे वाचलं का?

सामना अग्रलेखात काय?

पु.ल. देशपांडे यांच्या ‘वाऱ्यावरती वरात’ मधील ”दारू म्हणजे काय रे भाऊ” हा संवाद गाजला होता. तसाच देशात ”पनौती म्हणजे काय रे भाऊ” हा संवाद रंगला असे अग्रलेखात म्हटले आहे. अहमदाबाद येथील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारताचा पराभव. आता हा पराभव कोणाच्या ‘पनौती’मुळे झाला की कुठल्या पापी ग्रहामुळे, यावर ज्योतिषांनी खल करावा. सर्वसामान्य जनता मात्र 2014 पासून देशाच्या पाठीमागे लागलेल्या पनौतीबद्दल गांभीर्याने विचार करीत आहे, असा टोला सामना अग्रलेखातून पंतप्रधान मोदींचे नाव न घेता लगावला आहे.

हे ही वाचा : Gujarat Crime: चप्पल तोंडात घातली, बेल्टने मारलं… बॉस बनली ‘लेडी डॉन’!

राजस्थान आणि मध्यप्रदेश निवडणूक प्रचार सभेत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘पनौती’ आणि खिसेकापू असा केला होता. त्यामुळे भाजप चांगलीच खवळली होती आणि निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे आता निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे निवडणूकाचा फोलपणा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना ‘पनौती’ म्हटले व ‘पनौती’ शब्दाचे विश्लेषण केले. ‘पनौती’ म्हणजे नकारात्मक व्यक्ती किंवा संकटकाल. भाजप ज्यास अमृतकाल वगैरे म्हणत आहे तो संकटकाल आहे व त्याचा पनौतीशी संबंध आहे.

हे ही वाचा : Crime : लग्नाच्या पहिल्याच रात्री घात, खिरीमध्ये गुंगीचे औषध मिसळून…लग्नघरात काय घडलं?

पंतप्रधान मोदी व शहा यांनी याआधी काँग्रेस, गांधी परिवाराचा उल्लेख ‘राहू-केतू’, ‘राहुकाल’ असा केला होता! राहुल गांधी हे ‘पप्पू’ व ‘मूर्खांचे सरदार’ आहेत, अशी दूषणे लावली गेली तेव्हा निवडणूक आयोग भाजप कार्यालयात डोळ्यांवर गोधडी ओढून झोपी गेला होता काय? देशाला ‘पनौती’ लागली आहे व त्या पनौतीपासून राहुल गांधीच मुक्ती देऊ शकतील असा विश्वास सर्वसामान्यांना असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.

    follow whatsapp