महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर, शपथविधीची निमंत्रण पत्रिका पाहिली का?

ऋत्विक भालेकर

• 03:45 PM • 04 Dec 2024

महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी हा 5 डिसेंबर रोजी होणार आहे. ज्याची निमंत्रण पत्रिका समोर आली आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री कोण असणार त्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण हे आलं समोर

point

शपथविधीची निमंत्रण पत्रिका आली समोर

point

देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

मुंबई: भाजपने देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ नेता म्हणून आज (4 डिसेंबर) एकमताने निवड केली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब देखील झालं आहे. 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल हा समोर आला. पण तरीही मुख्यमंत्री कोण होणार याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. मात्र, आता ती अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. (the invitation card for the announcement of the name of the new chief minister of maharashtra and the oath taking ceremony)

हे वाचलं का?

देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील की, भाजप नेतृत्व इतर कोणाला मुख्यमंत्री करणार याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. पण जोवर विधीमंडळ नेता निवडला गेला नाही तोवर भाजपकडून फडणवीसांच्या नावाची अधिकृत घोषणा केली नाही. मात्र, आता नेता निवडीची प्रक्रिया पार पडल्यानंतर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. 

शपथविधीची निमंत्रण पत्रिका जशीच्या तशी... 

श्री. नरेंद्र मोदी (मा. पंतप्रधान) यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून
तसेच उप मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभ गुरुवार, दिनांक ५ डिसेंबर, २०२४ रोजी सायंकाळी ५-३० वाजता आझाद मैदान, फोर्ट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी आपण कृपया उपस्थित रहावे, ही विनंती.

पोशाख: राष्ट्रीय / समारंभीय

(१) ही निमंत्रणपत्रिका केवळ एका व्यक्तीकरिता आहे.
(२) समारंभस्थळी गेट क्रमांक ७ (महात्मा गांधी मार्ग) येथे प्रवेशासाठी ही निमंत्रणपत्रिका कृपया दाखवावी.
(३) सुरक्षेच्या दृष्टीने सायंकाळी ४-३० पर्यंत आसनस्थ होणे अनिवार्य आहे.
(४) कृपया भ्रमणध्वनी व्यतिरिक्त कोणतीही वस्तू सोबत आणू नये.
(५) ही निमंत्रणपत्रिका अहस्तांतरणीय आहे.

सुजाता सौनिक,
मुख्य सचिव

    follow whatsapp