Mumbai : दादरमध्ये आज सचिन तेंडुलकर यांचे गुरू आणि अनेक क्रिकेटर्सना घडवणारे क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मरणार्थ तयार करण्यात आलेल्या प्रतिकृतीच्या अनावरणाचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला राज ठाकरे, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांच्यासह रमाकांत आचरेकर यांच्याकडून धडे घेतलेले अनेक खेळाडू उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमातील एका घटनेची सध्या चांगलीच चर्चा होते आहे. (Sachin Tenulkar meets Vinod Kambli while sharing stage in Dadar Mumbai)
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Mohit Kamboj Vs Gajabhau : मोहित कंबोज यांचं पुन्हा ट्विट, 'गजाभाऊ'कडून पुन्हा उत्तर, म्हणाला बापाचं नाव...
राज ठाकरे, सचिन तेंडुलकर यांच्यासह दिग्गजांच्या उपस्थितीत या प्रतिकृतीचं अनावरण करण्यात आलं. यावेळी इथे हजारो लोक हा कार्यक्रम पाहण्यासाठी जमले होते. अनावर आटोपून सर्व मान्यवर स्टेजवर गेले. त्यावेळी सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरे यांच्यात गप्पा सुरू होत्या. येणारे लोक सचिन आणि राज ठाकरेंना भेटत होते. अशातच स्टेजवरील एका बाजूच्या खुर्चीवर विनोद कांबळी देखील येवून बसला. त्यावेळी सचिनची नजर विनोद कांबळीवर पडताच, सचिन स्वत: जावून आपल्या मित्राला भेटला. यावेळी सचिनने हस्तांदोलन करतानच विनोद कांबळीने मिठी मारली. दोन मित्रांच्या प्रेमाचा हा क्षण अनेकांनी डोळ्यात साठवून घेतला. स्वत: राज ठाकरे देखील या दोन मित्रांच्या भेटीच्या या क्षणाकडे पाहताना दिसले.
हे ही वाचा >> Chhagan Bhujbal : "शिंदेंच्या बरोबरीतच आम्हालाही...", मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटण्यापूर्वी भुजबळांची मागणी
दादरमध्ये शिवाजी पार्क परिसरात दिवंगत क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मरणार्थ एक खास प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या प्रतिकृतीमध्ये बॅट, स्टंप, हेल्मेट अशा गोष्टींचा समावेश आहे. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांच्यासह शेकडो खेळाडूंना रमाकांत आचरेकर यांनी क्रिकेटचे धडे दिले आहेत. आजही शेकडो खेळाडू या मैदानावर येऊन मोठा खेळाडू होण्याचं स्वप्न पाहत असतात. त्या सर्व खेळाडूंना प्रेरणा मिळाली या हेतूनं हे स्मारक तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे भविष्यात शिवाजी पार्कमध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी हे एक प्रेरणास्थान असणार आहे.
ADVERTISEMENT