ठाणे: देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक अशी ओळख असलेले आणि भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांनी आज (3 डिसेंबर) थेट ठाणे गाठत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ज्यानंतर त्यांनी अनेक मोठी विधानं केली आहेत.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे हे रुसले, रागावले किंवा चिडलेले नाहीत. त्यांना बरं नसल्याने ते आराम करत आहेत. असं म्हणत गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा शिंदेंना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, या भेटीनंतर गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले ते जाणून घ्या सविस्तर.
एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर पाहा गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले.
'एकनाथजी यांची तब्बेत खराब होती थ्रोट इन्फेक्शन आहे, ताप देखील आहे. मी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. तीन-चार दिवसांपासून मी वेळ मागत होतो. पण ते गावी निघून गेल्यामुळे माझा त्यांचा संपर्क झाला नाही.'
'युतीमध्ये सगळं आलबेल आहे. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. एकनाथजी यांचं मत प्रामाणिक आणि स्वच्छ आहे. उद्यापर्यंत त्यांची तब्येत ठीक होईल. त्यानंतर ते बैठक देखील घेतील.आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाही.'
'मंत्रिमंडळाबाबत माझी अशी कोणतेही चर्चा झाली नाही. हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. माझी एक शब्द देखील याबाबत चर्चा झाली नाही. तेच बोलले सहा डिसेंबरच्या तयारीबाबत बैठक आहे. ते लवकर बरे होतील. अजूनही त्यांना सलाईन लावलेलं आहे. उद्यापासून एकनाथजी स्वतः सगळ्या गोष्टींचे लीड घेतील. आम्ही सगळे एकत्र आहोत.'
'5 तारखेचा शपथविधी दिमाखदार होईल. प्रोटोकॉल आहे, त्यामुळे विरोधकांना बोलवावं लागणार आहे.'
'दिल्लीत बैठक होणार की नाही होणार, कोणती खाती कोणाकडे राहणार या बाबतीत कोणतेही चर्चा झाली नाही मला काहीही याबाबत माहीत नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे, याबाबतीत आमचे वरिष्ठ नेते देवेन्द्रजी, अजित दादा आणि एकनाथजी देखील आहेत ते याबाबतीत निर्णय घेतील.'
'आम्ही सव्वा तास चर्चा करत होतो. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. पुढचे पाच वर्ष आम्ही तिन्ही पक्ष महायुती म्हणून आम्ही सोबत काम करणार आहोत.'
'मी एकनाथजी यांना 30 वर्षांपासून ओळखतो. त्यामुळे छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी रुसले आहेत, रागावले आहेत, चिडले आहेत... असं अजिबात होणार नाही.' असंही गिरीश महाजन यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT