भाजप नेते आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज यांनी एक ट्विट करत चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. मोहित कंबोज यांनी गजाभाऊ नावाच्या एका एक्स युजरला टॅग करत एक ट्विट केलंय, ज्यामधून त्यांनी थेट धमकी दिल्याचं पाहायला मिळतंय. तर गजाभाऊ नावाच्या युजरनेही मोहित कंबोज यांना उत्तर दिल्याचं पाहायला मिळतंय.
ADVERTISEMENT
राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोशल मिडीयावरही टीका टिपण्ण्याचं युद्ध पाहायला मिळालं. यामध्ये गजाभाऊ आणि भाऊ गँग नावाचे एक्स हँडल्स हे कायम राजकीय विषयांवर ट्विट करत असल्याचं दिसलंय. तसंच त्यांच्या निशाण्यावर नेहमी भाजप, शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असायचे. तर दुसरीकडे मोहित कंबोज हे फडणवीस यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे याच सर्व टीका टिपण्यांना उत्तर म्हणून मोहित यांनी हे ट्विट करत इशारा दिल्याची चर्चा आहे.
हे ही वाचा >>Avinash Jadhav Resigns : राज ठाकरेंकडे तक्रार ते जीवघेणाहल्ला... अविनाश जाधव यांच्या राजीनाम्यामागची कहाणी
माझं पुढचं टार्गेट गजाभाऊ असं म्हणत मोहित कंबोज यांनी @gajabhauX या आयडीला टॅक केलं आहे. "धरती पे किधर भी होगे , उठा के लाए गे !" असा स्पष्ट इशारा मोहित कंबोज यांनी दिला आहे. तसंच हर हर महादेव लिहित हे ट्विट सेव्ह करुन ठेवा असंही कंबोज यांनी म्हटलं आहे.
गजाभाऊ नावाच्या एक्स हँडलवरुन कंबोज यांना उत्तर देण्यात आलं आहे. मोहित कंबोज यांच्या ट्विटवरच गजाभाऊ या अकाऊंटवरुन उत्तर देण्यात आलंय, की "येताना एकटा येऊ नकोस बापाला संगती घेऊन ये... मी पण वाट बघतोय..."
कोण आहे गजाभाऊ?
गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर हे एक्स हँडल तुफान चर्चेत आहे. तसंच भाजप आणि महायुतीमधील पक्षांवर टीका करत या अकाऊंटवरुन अनेक पोस्ट शेअर केल्या जातात. "जन्माने बॉक्सर, मुंबईकर पुणेकर आणि सांगलीकर, यांत्रिकी अभियंता संस्थापक सदस्य भाऊ गँग" असं या हँडलवरील बायोमध्ये लिहिलं असून, हे हँडल व्हेरीफाईड हँडल आहे. या अकाऊंटवरून केलेल्या पोस्टवरुन अनेकदा वाद निर्माण झाले आहेत.
मोहित कंबोज हे भाजप समर्थक असून, राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या वेगवेगळ्या घडामोडींमध्ये त्यांचा सहभाग दिसून आला आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, संजय राऊत यांच्यावर त्यांनी केलेल्या आरोपांची मालिका सर्वांनी पाहिली होती. तसंच ते वारंवार भाजप आणि महायुतीवर टीका करणाऱ्यांना इशारा देताना दिसून आले आहेत. त्यामुळे आता त्यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर पुढे नेमंक काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT