नवी दिल्ली: भाजपच्या संसदीय बोर्डाकडून महाराष्ट्र भाजपच्या नेता निवडीसाठी आता दोन दिग्गज नेत्यांची निवड केली आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, उद्याच हे दोन्ही नेते मुंबईत दाखल होणार आहेत. ज्यानंतर भाजपचा विधिमंडळ पक्षाचा नेता कोण याची निवड करतील. या निवडीनंतरच मुख्यमंत्री कोण यावर शिक्कामोर्तब केलं जाईल.
अखेर केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती झाली!
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हा 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. पण असं असलं तरीही अद्यापही सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. दरम्यान, आता नव्या सरकारचा शपथविधी हा 5 नोव्हेंबरला होणार हे जाहीर करण्यात आलं असलं तरी महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण? याबाबतचा कोणताही निर्णय अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.
हे ही वाचा>> Mohit Kamboj : "जिथे असशील तिथून उचलून आणू...", मोहित कंबोज यांचा थेट इशारा, कोण आहे गजाभाऊ?
त्यासाठी आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्मला सीतारामण आणि विजय रुपाणी यांची विशेष नियुक्ती केली आहे. आता हे दोन नेते भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेऊन भाजपचा विधीमंडळ नेता कोण असेल याची घोषणा करतील. हाच नेता भाजपचा मुख्यमंत्री असेल.
सध्या देवेंद्र फडणवीस यांचं नाव या शर्यतीत सर्वात पुढे. त्यामुळेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री तेच असतील हे जवळजवळ निश्चित आहे. मात्र, असं असलं तरीही कोणतीही अधिकृत घोषणा होईपर्यंत भाजपची कोणतीही शाश्वती देता येणार नाही.
एकनाथ शिंदे अद्यापही नाराज?
खरं तर 4 दिवसांपूर्वी अमित शाह यांच्या घरी एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली पण या बैठकीनंतर देखील मुख्यमंत्री कोण होणार याबाबत घोषणा करण्यात आली नाही. तसंच याच बैठकीनंतर एकनाथ शिंदे हे नाराज झाल्याचं दिसून आलं.
तेव्हापासून एकनाथ शिंदे हे अचानक गावी निघून गेले आणि त्यांची प्रकृती बरी नसल्याचं सांगण्यात आलं.
ADVERTISEMENT