Milind Deora News : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री राहिलेले आणि दक्षिण मुंबईचे खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत न्याय यात्रा आजपासून सुरू होत आहे. त्याच दिवशी मिलिंद देवरांनी राजीनामा दिला. त्यामुळे याची चर्चा होत आहे. यावरून काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. (Congress targets PM Modi After Milind Deora’s Resignation)
ADVERTISEMENT
मिलिंद देवरा यांनी १४ जानेवारी रोजी सकाळी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले. यानंतर काँग्रेस आणि विरोधकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. मणिपूरमधून काँग्रेसची भारत न्याय यात्रा सुरू होण्यापूर्वीच देवरांनी राजीनामा दिला. त्यामुळे याची चर्चा होत आहे. आता यावरून काँग्रेसने मोदींवर आरोप केला.
काँग्रेसचा मोदींवर आरोप काय?
काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना पंतप्रधान मोदी यांच्यावर शरसंधान साधले. रमेश म्हणाले की, “देवरांनी या शुक्रवारी (१२ जानेवारी) मला फोन केला होता. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केलेल्या दाव्यासंदर्भात राहुल गांधींशी बोलायचं आहे, असे ते म्हणाले होते. मिलिंद देवरा आणि त्यांचे वडील मुरली देवरा हे दक्षिण मुंबईचे खासदार राहिलेले आहेत.”
हेही वाचा >> शिंदेंच्या शिवसेनेत जाण्यामागे देवरांचा ‘हा’ आहे खरा प्लॅन?
जयराम रमेश म्हणाले, “12 जानेवारी रोजी सकाळी ८.५२ मिनिटांनी त्यांनी मला मेसेज केला. त्यानंतर दुपारी २.४७ वाजता जेव्हा मी त्यांना उत्तर दिले. मी त्यांना विचारलं की, तुम्ही पक्ष बदलण्याच्या विचारात आहात का? त्यानंतर २.४८ वाजता त्यांनी मेसेज केला की तुमच्याशी बोलणं शक्य नाहीये का? त्यानंतर मी ३.४० वाजता मी त्यांच्याशी कॉलवरून बोललो.”
देवरांनी रमेश यांना काय सांगितलं?
जयराम रमेश पुढे म्हणाले की, “देवरांनी मला सांगितलं की, ‘सध्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. मला राहुल गांधींना भेटायचं आहे आणि जागावाटपाबद्दल त्यांना सांगायचं आहे.’ मी यासंदर्भात राहुल गांधींनी बोलावं अशीही देवरा यांची इच्छा होती.”
हेही वाचा >> 27व्या वर्षी खासदार, मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये मंत्री; कोण आहेत देवरा?
रमेश पुढे म्हणाले की, “जाहीरपणे हा एक तमाशा होता. पक्ष सोडण्याचा त्यांचा निर्णय झालेला होता. त्यांच्या पक्ष सोडण्याच्या घोषणेची वेळ स्पष्टपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवली होती”, असा आरोप रमेश यांनी केला.
ADVERTISEMENT