MNS: भाजपसोबत युती नाहीच, राज ठाकरेंनी चौथा उमेदवार केला जाहीर!

मुंबई तक

07 Aug 2024 (अपडेटेड: 07 Aug 2024, 11:08 PM)

MNS VidhanSabha Election 2024: मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी आता चौथा उमेदवार देखील जाहीर करण्यात आला आहे. लातूर ग्रामीणमधून मनसेने संतोष नागरगोजे यांना उमेदवारी दिली आहे.

राज ठाकरेंनी चौथा उमेदवार केला जाहीर!

राज ठाकरेंनी चौथा उमेदवार केला जाहीर!

follow google news

बातम्या हायलाइट

point

मनसेकडून विधानसभेसाठी मराठवाड्यातील पहिला उमेदवार जाहीर

point

राज ठाकरेंच्या मराठवाडा दौरा सुरू असतानाचा उमेदवाराची घोषणा

point

लातूर ग्रामीण मतदार संघासाठी संतोष नागरगोजे यांची उमेदवारी जाहीर

MNS 4th Candidate Declared: लातूर: लोकसभा निवडणुकीत भाजपला जाहीर पाठिंबा देणाऱ्या मनसेने विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपसोबत युती न करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वीच याबाततची घोषणा स्वत: राज ठाकरेंनी केली होती. पण एवढ्यावरच न थांबता राज ठाकरेंनी थेट विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करणंही सुरू केलं आहे. काही दिवसांपूर्वीच मनसेने आपले तीन उमेदवार हे जाहीर केले होते. आज (7 ऑगस्ट) मनसेने त्यांचा चौथा उमेदवार देखील जाहीर केला आहे. (there is no alliance with bjp raj thackeray announced mns fourth candidate for maharashtra assembly election 2024)

हे वाचलं का?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान, मनसेने लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून संतोष नागरगोजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

हे ही वाचा>> Raj Thackeray यांना पुन्हा मराठ्यांनी घेरलं, विधानसभेत मनसेला बसणार फटका?

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते लातूर दौऱ्यावर असताना त्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत लातूर ग्रामीण मतदार संघासाठी संतोष नागरगोजे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आत्तापर्यंत विधानसभेसाठी तीन उमेदवार घोषित करण्यात आले आहेत त्यात मराठवाड्यातील पहिला व राज्यातील चौथा उमेदवार म्हणून संतोष नागरगोजे यांची उमेदवारी लातूर येथे विश्रामगृहात झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली.

हे ही वाचा>> Uddhav Thackeray: शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत कलह, थेट राजीनामे... नेमकं काय घडलं?

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी सेलचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या संतोष नागरगोजे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'मी आजपर्यंत इमानदारीने गेलेल्या कामाचं हे फळ असून मला लातूर ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्याबद्दल मी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचे खूप मनापासून आभार मानतो.' अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

मनसेची विधानसभेसाठी जोरदार तयारी 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून तीन उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. राज ठाकरेंचे विश्वासू बाळा नांदगावकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शिवडी विधानसभा मतदार संघातून मैदानात उतरणार आहेत. तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना मैदानात उतरवण्यात येणार आहे. तर वरळीतून संदीप देशपांडे यांनाही तिकीट देण्यात येणार असल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे.

    follow whatsapp