Uddhav Thackeray: मुंब्र्यातील शिवसेनेची शाखा शिंदे गटाकडून पाडण्यात आल्यानंतर शिंदे-ठाकरे (Shinde-Thackeary) गट आमने सामने आला. या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी तात्काळ मुंब्र्यातील शाखेला (Mumbra Shivsena) भेट देत ठाण्यात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी शिंदे गटाला धडा शिकवण्यासाठी मला ठाण्याच येण्याची गरज नाही असं सांगत, माझे शिवसैनिकच त्यांना धडा शिकवतील असंही त्यांनी यावेळी सांगितले.
ADVERTISEMENT
आज शाखा पाडली, उद्या…
मुंब्र्यातील शिवसेनेची शाखा पाडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, आज यांनी मुंब्र्यातील शिवसेनेची शाखा पाडली, उद्या हे कुणाचेही घर पाडतील असा शब्दात त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
हे ही वाचा >> Shiv Sena UBT: ‘…तर आम्ही तुम्हाला दिवसा फाडू’, ठाकरेंचा नेता शिंदे गटाला भिडला!
पोलिसांची मानसिकता समजू शकतो
ज्या सरकारने वारकऱ्यांवर लाठाचार्ज करायला लावला, त्याच सरकारने मराठा आरक्षणासाठी चाललेल्या आंदोलनावरही त्यांनी अमानुषपणे लाठीहल्ला करायला लावला. त्याच सरकारकडून पोलिसांच्या संरक्षणार्थ शिवसेनेची शाखा पाडायला लावली असल्याचा ठपका त्यांनी सरकारसर पोलिसांवर ठेवला आहे.
गद्दारांना सत्तेचा माज
मुंब्र्यातील शिवसेनेची शाखा पाडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. गद्दारांना सत्तेचा माज आल्यामुळेच मुंब्र्यातील शिवसेनेची शाखा त्यांच्याकडून पाडण्यात आली आहे. आताच्या सरकारला सत्तेचा माज आला असल्यामुळेच त्यांच्याकडून शिवसेनेची शाखा पाडण्यात आली आहे असा गंभीर आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.
शाखेला लावला बुलडोजर
गद्दार आणि मिंदे गटाला आता कोणताच पर्याय उरला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून शिवसेनेच्या प्रत्येक गोष्टीवर हक्क सांगितला जातो आहे. गेल्या कित्येक वर्षापासून असलेली शिवसेनेची शाखाही आता त्यांनी बुलडोजर लावून पाडली आहे. मात्र आता पोलिसांसह आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितो की, एक तर ते डबडं तुम्ही हटवा नाही तर आम्ही ते उचलून फेकून देऊ असा इशाराच त्यांनी यावेळी दिला आहे.
ADVERTISEMENT
