Uddhav thackeray announced first candidate, Amol Kirtikar : आगामी लोकसभा निवडणुक कोणत्याहीक्षणी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तारूढ महायुती आणि महाविकास आघाडीच जागावाटप अंतिम टप्प्यात पोहोचलंय. पण अद्याप जागावाटपाची घोषणा झाली नाही. त्याआधीच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतला त्यांचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे. हा उमेदवार उत्तर पश्चिम मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे ठाकरेंचा मुंबईतला पहिला उमेदवार कोण आहे? हे जाणून घेऊयात. (uddhav thackeray announced first candidate in mumbai amol kirtikar mumbai north west constituency)
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरेंनी आज मुंबईतील शाखांना भेट दिली होती.यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी त्यांचा मुंबईतील पहिला उमेदवार जाहीर केला. यावेळी ठाकरे म्हणाले की, ''आता सुद्धा मी तुम्हाला उमेदवार दिलेलाच आहे'', असे म्हणत कार्यकर्त्यांनी अमोल कीर्तीकरांच्या नावाची घोषणा केली. यानंतर ठाकरेंनी अमोल कीर्तीकरांना जवळ बोलावले आणि म्हणाले, एका निष्ठेने आणि जिद्दीने जिंकणारच, या निष्ठेने अमोल लढतोय.
हे ही वाचा : Supriya sule : "दमदाटी केली तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे"
''अमोलच्या पाठीसुद्धा चौकशीच शुक्लकाष्ठ लावण्याचा प्रयत्न चालुच आहे. पण मी सगळ्यांना सांगतोय, सगळे दिवस सारखे नसतात. आज तुम्ही आमच्या मागे लागला आहात. पण उद्या येणार सरकार आमचं आहे आणि ते सरकार आल्यानंतर जे जे लोक माझ्या सैनिकांना त्रास देत आहेत. त्या सगळ्यांना मी तुरूंगात टाकल्याशिवाय राहणार नाही'', असा इशारा ठाकरेंनी भाजपला दिला आहे.
दरम्यान अमोल कीर्तीकर हे शिंदेच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांचे सुपुत्र आहेत. गजानन कीर्तीकर हे शिंदेंच्या शिवसेनेकडून उत्तर पश्चिम मतदार संघातून लोकसभा लढवणार आहेत. त्यामुळे आता अमोल कीर्तीकरांच्या नावाची ठाकरेंनी घोषणा केल्याने बाप विरूद्द बेटा अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे.
ADVERTISEMENT