Shiv Sena UBT : मुंबईतील ठाकरेंचा आणखी एक आमदार शिंदेंच्या गळाला?

मुंबई तक

08 Feb 2024 (अपडेटेड: 08 Feb 2024, 07:44 PM)

Uddhav thackeray big blow in mumbai : मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. कारण ठाकरेंचा एक आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. कारण ठाकरेंचा एक आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागल्याची माहिती समोर आली आहे.

uddhav thackeray big blow in mumbai mla will leave ubt shiv sena eknath shinde camp ravindra waiker maharshtra politics

follow google news

Uddhav thackeray big blow in mumbai : मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. कारण ठाकरेंचा एक आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळत आहे. ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) या आमदाराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्यासोबत गुप्त बैठकही पार पडली आहे. या बैठकीनंतर हा आमदार शिंदेंच्या गळाला लागणार असल्याची चर्चा सुरु आहे. या आमदाराचे अद्याप नाव समोर आले नाही आहे. मात्र हा आमदार कोण आहे? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. (uddhav thackeray big blow in mumbai mla will leave ubt shiv sena eknath shinde camp ravindra waiker maharshtra politics) 

हे वाचलं का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या एका आमदारांमध्ये काही दिवसांपूर्वीच गुप्त बैठक पार पडली होती. या बैठकीत ठाकरेंच्या आमदाराने एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच या आमदाराने कार्यकर्त्यासह शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा मुख्यमंत्री शिंदे यांना शब्द दिल्याचीही माहिती आहे. अद्याप हा आमदार कोण आहे? हे स्पष्ट झाले नाही आहे. मात्र ठाकरेंना हा मुंबईत मोठा धक्का असणार आहे. 

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात दौऱ्यांना सुरूवात केली होती. नुकताच ठाकरेंनी त्यांचा कोकण दौरा पुर्ण केला होता. या दौऱ्यातून त्यांनी शिंदे गटाचे कोकणातील आमदार दिपक केसरकर आणि उदय सामंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. या दौऱ्यानंतर आता ठाकरे मुंबईतील शाखांना भेट देणार आहेत. या दौऱ्यापूर्वीच ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. 

दरम्यान हे वृत्त हाती येण्याआधीच संजय राऊतांनी एक्स या सोशल मीडिया प्लँटफॉर्मवर ट्विट केले होते. या ट्विटमध्ये राऊतांनी सांगितले की, शिवसेनेतील आमचे सहकारी नेते आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसापासून ED वैगरे तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव सुरू आहे.येत्या काही दिवसात शिवसेना सोडा..पक्षांतर करा.. नाहीतर तुरुंगात जा असे त्यांना धमकावले जात आहे.हा एक प्रकारे दहशतवाद आहे.असे राजकारण या आधी कधीच घडले नव्हते..रवींद्र वायकर हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते कोणत्याही धमक्या आणि दबावाला भीक घालणार नाहीत..ते लढतील व जिंकतील.आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत, असे म्हटले होते.

एकंदरीत संजय राऊत वायकरांनाच कोणत्याही दबावाला बळी न पडण्याचे आवाहन करताना दिसले. मात्र असे असले तरी ठाकरेंची साथ सोडणार हा आमदार कोण असणार आहे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

    follow whatsapp