Uddhav Thackeray Criticize Devendra Fadnavis And Eknath Shinde : अदाणींची सुपारी घेणाऱ्या दलालांना सांगतो, हा किती मोठा अडकित्ता आहे.तुमची दलाली चेचून, ठेचून टाकू की पुन्हा तुम्ही अदांनींच नाव घेणार नाही, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच 50 खोके कमी पडायला लागलेत म्हणून मुंबई आणि धारावी गिळायला बोके निघाले आहेत, अशी टीका देखील ठाकरेंनी शिंदे (CM Eknath Shinde) गटावर केली आहे. (uddhav thackeray criticize devendra fadnavis and eknath shinde on gautam adani dharavi project tdr scam mumbai news)
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) विरोधात विराट मोर्चा काढण्यात आला होता. टी जक्शनपासून बीकेसी मैदानापर्यंत हा मोर्चा काढला होता. या विराट मोर्च्यानंतर आंदोलक शिवसैनिकांना संबोधित करताना ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे टीडीआर लॉबीची बाजू घेतायत, असे देवेंद्र फडणवीस म्हणतात. मग तुम्ही अदानीचे बूट चाटताय, ते कशासाठी चाटताय, असा सवालच ठाकरेंनी फडणवीसांना केला. मी मुख्यमंत्री असताना नागरिकांना बाजुला ठेवून बिल्डरांसाठी घेतलेला एक तरी निर्णय दाखवा. बिल्डकधार्जिणे तुम्ही आहात. हा लढा मुंबईचा राहिला नाही आता महाराष्ट्राचा झाला आहे. अदानींनी मुद्रांक शुल्क माफ केलात म्हणून महाराष्ट्रावर आर्थिक परिणाम आहे, असा आरोप ठाकरेंनी केला.
हे ही वाचा : Crime: मुरबाडमध्ये माजी सभापतीने तरुणाचे दोन्ही हातच छाटले, पंजाही कापून फेकला!
ठाकरे पुढे म्हणाले, अदाणींची सुपारी घेणाऱ्या दलालांना सांगतो, हा किती मोठा अडकित्ता आहे.तुमची दलाली चेचून, ठेचून टाकू की पुन्हा तुम्ही अदांनींच नाव घेणार नाही. 50 खोके कमी पडायला लागलेत म्हणून मुंबई आणि धारावी गिळायला बोके निघाले आहेत, अशा शब्दात ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली.सरकार आपल्या दारी कार्यक्रम चालु आहे, पण हे सरकार अदांणींच्या दारी असल्याचा टोला देखील ठाकरेंनी शिंदे सरकारला लगावला.
हे ही वाचा : Security Breach: ‘अराजकता पसरवायची होती, आणि…’, संसद घुसखोरी प्रकरणी खळबळजनक खुलासा
धारावीतील सर्वांचा एफएसआय अदानीला देऊन टाकला आहे. पाऊस पाडणाऱ्या ढगांचा एफएसआय दिला नाही हे नशीब. ढगांची गरज नाही. सवलतींचा पाऊसच एवढा पाडला आहे, असं सांगतानाच हा जगातील सर्वात मोठा टीडीआर घोटाळा आहे, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.
ADVERTISEMENT