नागपूर : “शेतकऱ्यांचा आक्रोश सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अयोध्येला गेले. पण सुरुवातीला हे सुरतला गेले, गुवाहटीला गेले. यांच्या धमन्यांमध्ये खरंच हिंदुत्व असतं तर आधी अयोध्येला गेले असते. बरं, यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री पण गेले. पण फडणवीस कधी अयोध्येला गेले, हे तुम्हाला कधी आठवतं का? तुझा शर्ट माझ्या शर्टापेक्षा भगवा कसा, हे दाखविण्यासाठीच अयोध्येला गेले, नळाबरोबर गाड्याची यात्रा”, असं म्हणतं शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना त्यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन टोला लगावला. (Uddhav Thackeray criticizes Eknath Shinde and Devendra Fadnavis’ Ayodhya visit)
ADVERTISEMENT
महाविकास आघाडीची दुसरी वज्रमुठ सभा आज (रविवारी) नागपूरच्या दर्शन कॉलनी मैदानावर पार पडली. यावेळी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महाविकास आघाडीचे इतर नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
शेतकऱ्यांचा आक्रोश सुरु असताना शिंदे अयोध्या दौऱ्यावर :
यावेळी ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरही जोरदार टीका केली. हे अवकाळी आणि उलट्या पायाचं सरकार आलं, सतत गारपीट होत आहे. हवालदिल शेतकरी ओरडत आहेत, शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे. पण आमचे मुख्यमंत्री हे अयोध्येला देवदर्शनाला गेले. जा, पण हे राम राज्य महाराष्ट्रात कधी येणार? इकडे सरकारी अधिकारी पंचनाम्याला वेळेवर जात नाहीत, नंतर मुख्यमंत्री जातात अन् आदेश काय देतात, ताबडतोब पंचनामे करा. आम्ही सरकारमध्ये असताना वेळेत मदत पोहचत होती. आता शेतकरी काय बोलतात तर पंचनामे नका करू आमच्या मयताला या. हे निर्लज्ज आहेत, हे तिकडेही जातील.
Uddhav Thackeray : ‘सच्चा समाजसेवकापुढे तुम्हाला झुकावचं लागलं…’ ठाकरेंचा शाहंना टोला
फडणवीसांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका :
आम्ही सरकारमध्ये असताना न्यायालयाने राममंदिरांचा निकाल दिला. आता हे अयोध्येला गेले. पण सुरुवातीला हे सुरतला गेले, गुवाहटीला गेले. यांच्या धमन्यांमध्ये खरंच हिंदुत्व असतं तर आधी अयोध्येला गेले असते. बरं, यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्रीही गेले. पण फडणवीस आजपर्यंत कधी अयोध्येला गेले, हे तुम्हाला कधी आठवतं का? केवळ तुझा शर्ट माझ्या शर्टापेक्षा भगवा कसा, हे दाखविण्यासाठीच हे अयोध्येला गेले, असा टोला ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
’16 आमदार अपात्र झाले, तर…’, अजित पवारांनी केली बेरीज अन् सांगितला बहुमताचा आकडा
चंद्रकांतदादा, तुम्ही आणि तुमचे काका गेले होते का?
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर टीका करताना ठाकरे म्हणाले की, बाबरीच्या वेळेला शिवसैनिक नव्हते, शिवसेनाप्रमुख नव्हते म्हणता, मग काय तुम्ही आणि तुमचे काका गेले होते का? बाबरी पाडल्यानंतर भाजपच्या गोटात पळापळ झाली होती, तेव्हा शिवसेनाप्रमुख म्हणाले, माझ्या शिवसैनिकांनी हे केलं असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. शिवसेनाप्रमुखांचा अपमान तुम्ही करता, त्यांचं योगदान तुम्ही नाकारता? माझं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांनाही विचारणा आहे की, तुम्हाला हे चंद्रकांत पाटलांचे म्हणणं पटतं का?
ADVERTISEMENT