Uddhav Thackeray: "येत्या रविवारी...", राजकोट किल्ल्यावर राडा; उद्धव ठाकरेंनी दिला 'हा' इशारा!

मुंबई तक

28 Aug 2024 (अपडेटेड: 28 Aug 2024, 05:46 PM)

Uddhav Thackeray Press Conference: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते प्रचंड आक्रमक झाले असून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करत आहेत. राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे गटात तुफान राडा झाल्यामुळं राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारला इशारा दिला आहे. 

Uddhav Thackeray Press Conference

Uddhav Thackeray Press Conference

follow google news

बातम्या हायलाइट

point

राजकोट किल्ल्यावर राडा झाल्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक

point

उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला दिला मोठा इशारा

point

उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?

Uddhav Thackeray Press Conference: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते प्रचंड आक्रमक झाले असून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करत आहेत. राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे गटात तुफान राडा झाल्यामुळं राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारला इशारा दिला आहे. 

हे वाचलं का?

येत्या रविवारी म्हणजे १ तारखेला हुतात्मा स्मारकात वंदन करून तिथून आम्ही सर्वजण गेट वे ऑफ इंडियाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यसमोर आम्ही जमणार आहोत. तो पुतळा उभारून किती वर्ष झाली, तरीसुद्धा तो पुतळा मजबुतीनं उभा आहे. या सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी जोडो मारो हा कार्यक्रम आम्ही तिथे करणार आहोत. (After the fall of the statue of Chhatrapati Shivaji Maharaj, the leaders of Mahavikas Aghadi have become very aggressive and are attacking the rulers. The political atmosphere has heated up due to the clash between Thackeray and Rane factions at Rajkot fort)

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय म्हणाले? 

"मी सर्व शिवप्रेमींना विनंती करतोय की, या सरकारचा जो कारभार चालला आहे, त्याचा निषेध करण्यासाठी त्यांनीही या आंदोलनात सहभागी व्हावं. मालवणमध्ये ठाकरे-राणे गटात झालेल्या राड्याबाबत प्रतिक्रिया देतना उद्धव ठाकरे म्हणाले, हे आता कोकणवासीयांना कळलं असेल. कारण गेल्या लोकसभेच्या आधी ज्या पद्धतीनं मोदी तिथे आले होते, त्यावेळी सिंधुदुर्गच्या साक्षीने नौदल दिन साजरा केला गेला.

सर्वांना याचा अभिमान निश्चितपणे वाटला. आपण काहीतरी गाजवतोय आणि त्याचं श्रेय घ्यायचंय, म्हणून ढीसाळ घाईने जो पुतळा उभा केला गेला, त्याबाबतही आता सर्व गोष्टी उघड होत आहेत. तो शिल्पकार कोण होता? ती कंपनी कोणती होती. त्यामध्ये ठाणे कनेक्शन कसं होतं?" असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. 

या स्मारकाच्या कामातसुद्धा कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाला आहे. ते सांगतात की वाईट घडल्यानंतर काहीतरी चांगलं घडणार. म्हणजेच पुन्हा एकदा पुतळा उभारण्याचा घाट घालणार. त्यातून पुन्हा टेंडर काढणार. त्या टेंडरमध्येही घोटाळा काढणार. यांच्या कारभाराची किळस यायला लागली आहे. हा किळसवाणा कारभार आहे, असं म्हणत ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

 

    follow whatsapp