Sushama Andhare : ''सरसंघचालक साहेब देवेंद्रजींचे कान उपटा'', दसरा मेळाव्यात अंधारे कडाडल्या!

मुंबई तक

12 Oct 2024 (अपडेटेड: 12 Oct 2024, 07:15 PM)

Sushma Andhare criticize Devendra Fadnavis : असे चाराणे, बाराणे तुम्ही इथे बाजारात आणाताय. तुमची न खपलेली चिल्लर जातीद्वेष पसरत असतील तर सरसंघचालक साहेब देवेंद्रजींचे कान उपटा आणि सांगा त्यांना आम्हाला महाराष्ट्र शांत हवाय. इथे सांप्रदायिक विभाजन करू नका'', अशी बोचरी टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केली.

uddhav thackeray dasara malava sushama adhare criticize devendra fadnavis narayan rane famili mohan bhagwat maharashtra politics

असे चाराणे, बाराणे तुम्ही इथे बाजारात आणाताय.

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोकणमध्ये न चालणारी चिल्लर

point

चाराणे, बाराणे तुम्ही इथे बाजारात आणताय

point

तुमची न खपलेली चिल्लर जातीद्वेष पसरवतात

Sushma Andhare criticize Devendra Fadnavis : ''कोकणमध्ये न चालणारी चिल्लर, जी बाजारातून रद्दबातल झाली आहे. असे चाराणे, बाराणे तुम्ही इथे बाजारात आणाताय. तुमची न खपलेली चिल्लर जातीद्वेष पसरत असतील तर सरसंघचालक साहेब देवेंद्रजींचे कान उपटा आणि सांगा त्यांना आम्हाला महाराष्ट्र शांत हवाय. इथे सांप्रदायिक विभाजन करू नका'', अशी बोचरी टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केली. (uddhav thackeray dasara malava sushama adhare criticize devendra fadnavis narayan rane famili mohan bhagwat maharashtra politics) 

हे वाचलं का?

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर पार पडत असलेल्या दसरा मेळाव्यात सुषमा अंधारे बोलत होत्या. यावेळी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दसरा मेळाव्याच्या भाषणातील काही मुद्दे अंधारे यांनी सांगितले. द्वेश संपला पाहिजे, सांप्रदायिक विभाजन होता कामा नये, देश बलशाली झाला पाहिजे. जाती धर्माच्या भिंती तोडल्या पाहिजेत. दुर्बल घटकांना सोबत घेतले पाहिजे.सरसंघचालक जी आपलं म्हणण सर ऑखो पर. पण संरसंघचालक जी जर खरंच द्वेषबुद्धी संपवायचा सल्ला द्यायचा आहे तर तो सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीसांना द्यावा. ज्यांनी या राज्यात माणसात माणूस ठेवला नाही, जातीत जातं ठेवली नाही. आणि द्वेषाचं राजकारण पसरवलं, अशी टीका अंधारे यांनी फडणवीसांवर केली.

हे ही वाचा : दसरा मेळाव्याआधीच राडा! ठाकरे-शिंदेंचे कार्यकर्ते आमने सामने; कल्याणमध्ये काय घडलं?

सुषमा अंधारे यांनी पुढे राणेंचा चिल्लर अशा देखील उल्लेख केला. ''कोकणमध्ये न चालणारी चिल्लर, जी बाजारातून रद्दबातल झाली आहे. असे चाराणे, बाराणे तुम्ही इथे बाजारात आणाताय. तुमची न खपलेली चिल्लर जातीद्वेष पसरत असतील तर सरसंघचालक साहेब देवेंद्रजींचे कान उपटा आणि सांगा त्यांना आम्हाला महाराष्ट्र शांत हवाय. इथे सांप्रदायिक विभाजन करू नका'', अशी टीका सुषमा अंधारे यांनी फडणवीसांवर केली. 

हे ही वाचा : Mumbai Rain : ठाकरे-शिंदेंना पाऊस देणार गुलीगत धोका, दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट!

 

 

 

    follow whatsapp