Uddhav Thackeray Latest Speech : "आपल्या सर्वांचं मातोश्रीत आणि शिवसेनेत स्वागत करतो. दसऱ्यानंतर आज पहिल्या प्रथम तुमच्यात आलो आहो. मधल्या काळात हॉस्पिटलची वारी करावी लागली होती. डॉक्टर म्हणाले होते आराम करा. पण आता आराम करायचा तरी किती? आधी हराम्यांना घालवायचं आहे. आता आराम नाही. पण आज कामाला सुरुवात करण्याचा मुहूर्त चांगला लागला आहे. आबासारखा एक मजबूत गडी शिवसेनेत सामील होत आहे. शिवसेना परिवारात सामील झालेले आहेत. आबा तुमच्या हातात मशाला दिलेली आहे. आता ही मशाला कशी पेटवायची आणि कुणाला चटके द्यायचे? हे तुम्ही ठरवायचं आहे", असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला. राजन तेली आणि दीपक साळुंखे यांनी मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
ADVERTISEMENT
कार्यकर्त्यांना संबोधीत करताना ठाकरे पुढे म्हणाले, ही निवडणूक सोपी नाही. दिपक (आबा) आल्यानंतर विजय नक्की आहे, हे मला माहित आहे. विजय नक्कीच होणार आहे, मग मी सभेला आलोच नाही तर, मग तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही आजपासून संपूर्ण घराघरात ही मशाल पोहोचवली पाहिजे. हे गद्दार आहेत, हे नुसतेच गद्दार नाहीयत. तर बरेच खोके वगैरे घेऊन बसलेले आहेत.
हे ही वाचा >> Salman Khan Threat Message : 'सलमान'ला पुन्हा धमकी; वाहतूक पोलिसांना आलेल्या मेसेजमध्ये काय म्हटलंय?
धनुष्यबाण आणि मशाल असा संभ्रम ते निर्माण करत आहेत. शिवसेना प्रमुखांची बाळासाहेबांची निशाणी ही मशाल आहे. ही आत्तापासून तुम्हाला घराघरात न्यावी लागेल. मला खात्री आहे, विजय हा नक्की आहेच. उमेदवारी अजून कुणाचीच जाहीर केलेली नाही. फक्त दिपक आबांच्या हातात मशाल दिलेली आहे. मशालीची धग तुम्हाला दाखवून द्यायची आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
ADVERTISEMENT