Uddhav Thackeray On Baba Siddiqui Murder : "सर्व बाबतीत बोजवारा उडालेला आहे. काल बाबा सिद्दीकींची हत्या झाली. आपल्या देशात मुंबई कदाचित एकमेव शहर असेल, ज्या मुंबईला दोन पोलीस कमिशनर आहेत. आणखी पाच वाढवा काही हरकत नाही. जे जे त्यांचे लाडके असतील, त्या सर्वांना कमिशनर करा. पण कारभाराचं काय? महिला असुरक्षीत आहेत. राजकारणी असुरक्षीत आहेत. सत्ताधारी पक्षाचे नेते असुरक्षीत आहेत. मग सामान्य जनतेचं काय? या गद्दारांच्या सेवकांना जेव्हढी सुरक्षा दिली गेली आहे, ती सुरक्षा काढून तुम्ही जनतेसाठी का वापरत नाहीत. यांच्या घरी धुणी-भांडी करणाऱ्यांनाही सुरक्षा दिली असेल. ही सुरक्षा जनतेसाठी आहे. हे पोलीस जनतेचे रक्षक आहेत", असं मोठं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले, "गद्दारांचा पंचनामा असं हे सरकार आहे. गद्दारी फक्त शिवसेना आणि पवार साहेबांच्या राष्ट्रवादीशी केली, अशातला भाग नाही. ही गद्दारी महाराष्ट्राशी झाली आहे. महराष्ट्र मोदी-शहांच्या गुलामांची वसाहत झाली आहे. अशा पद्धतीने जे सरकार चालवत आहेत, हे सरकार आता घालवायला पाहिजे. येत्या निवडणुकीतच घालवायला लागेल. महाराष्ट्राच्या राजधानीत अशाप्रकारच्या हत्या होत असतील, महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होत असतील, कुणी काय करायचं? हे सरकार आपल्या अंगाला काही लागू देत नाहीत. तुम्हाला सर्वांना आठवत असेल, काही महिन्यांपूर्वी आमच्या अभिषेक घोसाळकरची हत्या झाली.
हे ही वाचा >> Gangster Lawrence Bishnoi: बॉलिवूडचा 'तो' दिग्गज अभिनेता लॉरेन बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये पहिल्या नंबरवर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ही जबबदारी गृहमंत्र्यांची आहे. गृहमंत्री त्यांचे मोठ मोठे होर्डिंग लावतात. पण कारभाराची जबाबदारी घेत नाहीत. त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलले होते, गाडीच्या खाली कुत्रं जरी आलं तरी तुम्ही आमचा राजीनामा मागा. म्हणजे तुमच्या राज्यात तुम्ही सर्वसामान्य माणसाच्या जीवाच्या तुलना कुत्र्यासोबत करता. मग तुम्ही राज्यकर्ते म्हणून राहायच्या लायकीचे नाहीत. संपूर्णपणे उधळपट्टी करणारं, महाराष्ट्र लुटणारं हे सरकार आहे. ज्यांना जबाबदारी घेण्याची हिंमत नाही. सिनेतारे यांना घेऊन मोठ्या जाहिरात केल्या जात आहेत.
कुणाचे हे पैसे आहेत? तुम्ही जरी त्यांचा वापर करून टीव्ही आणि पेपरमध्ये जाहीरात देत असलात, तरी जाहीराती बघणारे आणि स्वत:चा अनुभव तपासून बघणारी लोक एकच आहेत. तुम्ही जेव्हढा पैसा जाहिरातींवर उधळता, तेव्हढा पैसा माझ्या जनतेच्या सुरक्षेसाठी का नाही देत? हा गद्दारांचा पंचनामा आणि आरोपपत्र भ्रष्टाचारी आणि अत्याचारी सरकारवर जनतेच्या न्यायालयात मांडत आहोत. जनता याचा न्याय निवाडा करेल, याची आम्हाला खात्री आहे. म्हणून जनतेसाठी लढत राहू आणि महाराष्ट्राला कुणाचाही गुलाम होऊ देणार नाही", असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा >> Baba Siddiqui Security: बाबा सिद्दीकींकडे कोणत्या दर्जाची सेक्युरिटी होती? Y की Z?
ADVERTISEMENT