Uddhav Thackeray Eknath Shinde MLA Disqualification Case : राज्यातील अंगणवाडी सेविकांचं मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी संबोधित करताना ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा लक्ष्य केले. यावेळी भाजपवरही ठाकरेंनी टीकेचे बाण डागले.
ADVERTISEMENT
“प्रत्येक वेळेला आंदोलन पेटलं की, मंत्री येतात. मग हे अधिवेशन जाऊ द्या पुढच्या अधिवेशनात आम्ही याचा निकाल लावतो. पुढच्या अधिवेशनात तू टिकशील का? तुझं सरकार राहील का? तुला दिल्लीतून जसं बोललं जातं, तसं तू करतो”, असे म्हणत ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्ला चढवला.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “मी नागपूरच्या अधिवेशनाला होतो. तिकडे जुनी पेन्शनवाली मंडळी आली होती. मी तिथे गेलो होतो. मी तिथे जे बोललो तेच सांगणार आहे. कोरोनाचं संकट टळलं आणि कामाला सुरूवात करतो, तेव्हाच माझं ऑपरेशन निघालं. त्यातून उभा राहतो ना राहतो, तोच यांनी गद्दारी करून आपलं सरकारच पाडलं.”
सरकार पाडलं नसतं, तर…
“सरकार पाडलं नसतं, तर आज तुम्हाला इकडे आंदोलनासाठी यावं लागलं नसतं. तुमची सेवा ज्यांना कळत नाही ना, ते कृतज्ञ लोक आहेत. नुसत्या जाहिराती बघायच्या. गुटगुटीत मंत्र्यांचे फोटो आणि सुदृढ भारत. गुटगुटीत मंत्री म्हणजे महाराष्ट्र सुदृढ नाही. आरोग्य मंत्री सुदृढ असतील खेकडे खाऊन. पण, खऱ्या भारताला सुदृढ करण्याचे काम तुम्ही करता”, असे टीकास्त्र उद्धव ठाकरेंनी डागलं.
हेही वाचा >> “मी मेलो होतो, हा माझा दुसरा जन्म”, श्रेयसने सांगितला हार्ट अटॅकचा भयंकर अनुभव
“या सरकारकडे तुम्हाला द्यायला पैसे नाही. यांच्याकडे जाहिरातींवर उधळायला पैसे आहेत. या सरकार कोणते सरकार म्हणतात? (मैदानात उपस्थित अंगणवाडी सेविका म्हणाल्या खोके सरकार). खोके सरकार. यांच्याकडे सरकार आणायला खोके आहेत. माझ्या अंगणवाडी ताईला मानधन द्यायला पैसे नाहीत”, अशा शब्दात ठाकरेंनी शिंदेंवर निशाणा साधला.
हेही वाचा >> संजय राऊतांचा फडणवीस, शेलारांना ‘जालीम डोस’! दाखवला वाजपेयी-आडवाणींचा व्हिडीओ
अंगणवाडी सेविकांशी संवाद करताना ठाकरे म्हणाले, “मी माझी जाहिरातबाजी करायला आलो नाही. आता पाटील साहेब म्हणाले की, ‘भाजपला मत द्यायचं नाही.’ हा. तुम्हाला योग्य वाटत असेल, तर जरूर द्या. मध्य प्रदेशात भाजप हरणार असा अंदाज होता. पण भाजप जिंकले. जिंकल्यानंतर त्यांनाच कळेना कसे जिंकलो. काहीजण म्हणतात ईव्हीएममुळे जिंकलो”, असे म्हणत ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला.
“कारणमीमांसा झाली, त्यात एक कारण आलं ते म्हणजे लाडली बहना. एक योजना तिथल्या सरकारने महिलांसाठी राबवली. मग माझ्या या भगिनी आहेत, त्या लाडल्या आहेत की नाही? तळागाळातील महाराष्ट्रात तुम्ही जाता. कोरोना काळात तुम्ही घरोघरी जात होतात”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ADVERTISEMENT