Uddhav Thackeray criticized shind group: डोंबिवली: ‘गद्दारांना कधीही पुन्हा संधी देणार नाही. त्यांनी शाखा तोडली.. आपली सत्ता येऊ द्या त्यांचे आता कंबरडेच मोडतो..’ असं विधान करत शिवसेना (UBT)चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. शिवसेनेत बंड झाल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गट हे सातत्याने एकमेकांसमोर उभे ठाकत आहेत. अशावेळी उद्धव ठाकरेंनी आज (10 जानेवारी) कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या चिरंजीवांवर देखील टीकेचे बाण सोडले. (uddhav thackeray visit to kalyan lok sabha constituency stormy criticism of shinde group)
ADVERTISEMENT
डोंबिवलीमध्ये बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाबद्दल बराच संतापही व्यक्त केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीला कामाला लागण्याचे आदेशही दिले.
पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले..
‘मी व्यंगचित्रकाराचा मुलगा आहे, त्यामुळे चित्र कुठले रेखाटायचे ते मला चांगले समजते. गद्दारांना पुन्हा संधी मी देणार नाही. ज्यांनी सगळ्या शाखा तोडल्या पण निवडणुकीत मी त्यांचं कंबरडं मोडणार.’ असं विधान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
‘मी मोठ्या मनाचा नक्की आहे.. मात्र, तरीही गद्दारांना कधीही पुन्हा संधी देणार नाही. डोंबिवलीची शाखा पळवली, मुंबईची शाखा तोडली.. आपली सत्ता येऊ द्या त्यांचे आता कंबरडेच मोडतो..’ असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले.
हे ही वाचा>> Uddhav Thackeray: ‘मी तेव्हा चूक केली… बापाची जहागिरी वाटते..’, कल्याणमध्ये ठाकरेंची श्रीकांत शिंदेंवर टीकेची झोड
डोंबिवली मध्यवर्ती शाखेला देखील उद्धव ठाकरे यांनी सदिच्छा भेट दिली. यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.
राहुल नार्वेकरांनाही सुनावलं…
‘राहुल नार्वेकरांनी ज्या पद्धतीने निकाल दिला.. पण त्यांनी जनतेत येऊन शिवसेना कोणाची हे विचारण्याची हिंमत दाखवावी.. तुम्हाला कळेल शिवसेना कोणाची आहे.. कडेकोट बंदोबस्तात बसून शिवसेना कोणाची याचा निर्णय होऊ शकत नाही.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या शिवसेनेच्या निकालावरून त्यांच्यावर टीका केली.
‘थापा मारून लोकांची फसवणूक करणारी लोक आज मंदिरे साफ करतात.. चांगलं आहे त्यांना थोडं तरी पुण्य लागेल.’ असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
हे ही वाचा>> Dombivli: लोढा संकुलातील टॉवरला भीषण आग, सहाव्या मजल्यापर्यंत आगडोंब
‘नवी मुंबई विमानतळ आणि छत्रपती संभाजीनगरचे नाव आम्ही देण्याचे काम केले. मात्र तुम्ही आता विमानतळाला दि. बा. पाटील आणि छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाला छत्रपती संभाजी नगर विमानतळ असे नाव देणार का? हे आम्हाला बघायचे आहे.’ असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT