Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येणार ? शरद पवार म्हणाले…

मुंबई तक

06 Jul 2023 (अपडेटेड: 06 Jul 2023, 03:40 PM)

राष्ट्रवादीच्या शरद पवार यांना ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर शरद पवार यांनी चांगली गोष्ट आहे, असे स्मितहास्य करत उत्तर दिले आहे.

udhhav thackeray and raj thackergay came together sharad pawar reaction natinal meeting delhi

udhhav thackeray and raj thackergay came together sharad pawar reaction natinal meeting delhi

follow google news

Maharashtra Politics latest News : राज्यात एकीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बंडखोरीची चर्चा असताना, दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे अशी साद कार्यकर्ते घालत आहे. दादर आणि ठाण्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी करून ही साद घातली होती. या सर्व घडामोडींवर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार यांना ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर शरद पवार यांनी चांगली गोष्ट आहे, असे स्मितहास्य करत उत्तर दिले आहे. (udhhav thackeray and raj thackergay came together sharad pawar reaction natinal meeting delhi)

हे वाचलं का?

राष्ट्रवादीच्या शरद पवार यांनी आज दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक बोलावली होती. ही बैठक संपुष्ठात आल्यानंतर शरद पवार आणि कार्यकारीणीने पत्रकार परिषद घेतली होती. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल आणि सरचिटणीस सुनील तटकरे, आर.एस. कोहली यांच्यासह 9 आमदारांचे निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याची माहिती पत्रकार परीषदेत देण्यात आली.

अजित पवार यांनी बुधवारीच राष्ट्रीय अध्यक्ष पदावर दावा सांगितला होता. यावर शरद पवार म्हणाले, पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष मीच आहे, बाकी कोणी काही बोलतं त्यात तथ्य नाही. तसेच वय 82 असो की 92, वय हा मुद्दा नाही, वयाच्या 92 वर्षापर्यंत लढू, असा आत्मविश्वास व्यक्त करत शरद पवारांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले.मला पुर्ण विश्वास आहे, 2024 मध्ये सत्ता बदलले, सध्या सत्तेत असलेल्यांना सत्तेबाहेर बसावे लागेल. आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि कॉंग्रेसचे सरकार येईल असा आत्मविश्वास देखील शरद पवार यांनी व्यक्त केला.

    follow whatsapp