Union Minister Nitin Gadkari Speech: "आपल्या देशाला आत्मनिर्भर भारत बनवायचं आहे. 5 ट्रिलियन ड्रॉलरची इकोनॉमी तयार करायची आहे. या देशाला जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनवायची आहे. हे जर करायचं असेल, तर आपल्या इथे सर्वात मोठी देणगी आपल्याकडे आहे. जगातील सगळ्यात यंग टॅलेन्टेड इंजीनिअरिंग मॅन पॉवर जगात कुठल्या देशात असेल, तर त्या देशाचं नाव हिंदूस्थान आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आपलं भविष्य उज्ज्वल आहे. मधल्या काळात आपल्या देशातून आयआयटीमधून जे विद्यार्थी पास झाले, त्यांनी एमबीए केलं. यूरोपिअन आणि अमेरिका देशात ते सर्व सीईओ आहेत. त्यांचा पगारही कल्पना शक्तीच्या बाहेर आहे. आपली तरुण मुलं जगात जाऊन किती मोठं काम करतात. मायक्रॉसॉफ्ट, गुगल असेल, जगातील मोठ मोठी रिसर्च असतील, या सगळ्यात भारतीय इंजीनिअर्सचा खूप मोठा सहभाग आहे. त्यामुळे ज्ञानाच्या भरवशावर आपण जगात राज्य करू शकतो", असं मोठं विधान केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सांगलीत इस्लामपूरमध्ये एका कार्यक्रमात केलं.
ADVERTISEMENT
नितिन गडकरी जनतेला संबोधित करताना म्हणाले, "इतकं नॉलेज हे महत्त्वपूर्ण आहे. पण नॉलेजच्या बाबतीत अनेक प्रकारच्या फॅसिलिटी याठिकाणी आहेत. यामुळे आपलं जीवन सुसह्य होणार आहे. सध्या जगात एका मोठ्या गोष्टीची चर्चा सुरु आहे. आपल्या मराठी भाषेत त्याला सुखांक असं म्हणतात. भूटानच्या प्रधानमंत्र्यांनी यूनोमध्ये एक भाषण दिलं. त्यांनी सांगितलं आपण सुखांक वाढवला पाहिजे. सुखांक वाढवला याचा अर्थ असा होता, आपल्या गावात जे लोक राहतात त्यांना उत्तम घर मिळालं पाहिजे. त्यांच्या मुलांना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे. त्यांना उत्तम सुविधा मिळाल्या पाहिजेत. शेतकरी असतील तर ते समृद्ध आणि संपन्न झाले पाहिजेत. त्यांच्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग झाले पाहिजेत. या सर्वामधून पर कॅपिटा इनकम वाढणार आहे, त्यातून गावं समृद्ध आणि संपन्न होणार आहेत. अशी सुखांकची त्यांची कल्पना होती".
हे ही वाचा >> Supriya Sule: "70 दिवस व्हायला आले, मग पाचवा खुनी...", संतोष देशमुख हत्याप्रकरणी सुप्रिया सुळेंचं मोठं विधान!
"आज जेव्हा मी आपल्या गावात आलो, तेव्हा कल्पनाही करू शकलो नाही की या इस्लामपूरसारख्या शहरात एवढं मोठं इंजीनिअरिंग कॉलेज तयार होईल. मी ज्यावेळी महाराष्ट्र सरकारमध्ये होतो. 18 वर्ष महाराष्ट्राच्या विधिमंडळात राहण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी आमची एक कमिटी तयार झाली होती. शिक्षण मंत्रालयाने आम्हाला महाराष्ट्र सरकारला एक दौरा करून शिक्षण मंत्रालयाला एक रिपोर्ट द्यायचा होता. आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो आणि आल्यानंतर ज्यावेळी रिपोर्ट द्यायची वेळ आली, त्यावेळी मी शिक्षण मंत्र्यांना सांगितलं की, आमचा रिपोर्ट चार वाक्यातच संपू शकतो. ते म्हणाले एवढ्या कमी शब्दात कसं संपणार. तेव्हा त्यांना मी सांगितलं, ज्या गावात शाळेची बिल्डिंग होती, तिथे शिक्षक नव्हते. जिथे शिक्षक होते, तिथे बिल्डिंग नव्हती. जिथे दोन्ही होते तिथे विद्यार्थी नव्हते. जिथे तिन्ही होते तिथे शिक्षण नव्हतं. त्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात", असंही नितिन गडकरी म्हणाले.
हे ही वाचा >> Sanjay Raut : 'वाल्किम कराडचा बॉस धनंजय मुंडे...', धस-मुंडे भेटीनंतर संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
ADVERTISEMENT
