Vidhan Parishad Election: कोणाचे आमदार कुठल्या हॉटेलमध्ये, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?

ऋत्विक भालेकर

• 10:18 PM • 10 Jul 2024

Vidhan Parishad Election 2024: महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. जाणून घ्या याच निवडणुकीच्या नेमक्या राजकारणाविषयी.

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?

follow google news

बातम्या हायलाइट

point

विधानपरिषद निवडणुकीची उत्सुकता शिगेला

point

महायुती की महाविकास आघाडी कोण मारणार बाजी

point

दगाफटका होऊ नये यासाठी आमदार हॉटेल्समध्ये

Vidhan Parishad Election and Maharashtra Politics: मुंबई: महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. 11 जागांसाठी एकूण 12 अर्ज आल्याने आणि कुणीही अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक होणार हे निश्चित झालं. राज्यातील राजकीय समीकरणं लक्षात घेतल्यास ही निवडणूक रंजक बनली आहे. कारण छुप्या पद्धतीने मतदान होणार असल्याने   क्रॉस व्होटिंगही होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मतदानापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेसह महायुतीमधील पक्षांना दगाफटका होण्याची भीती आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हॉटेल/रिसॉर्ट पॉलिटिक्स सुरू झालं आहे. (vidhan parishad election whose mlas in which hotel political earthquake again in maharashtra)

हे वाचलं का?

भाजप, शिवसेना (UBT), शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांनी त्यांच्या आमदारांना हॉटेलमध्ये राहण्याचे आदेश दिले आहेत.

हे ही वाचा>> Mazi Ladki Bahin Yojana List: 1500 रुपये मिळणार की नाही? असं तपासा यादीत तुमचं नाव!

कोणत्या पक्षाचे आमदार कोणत्या हॉटेलमध्ये?

भाजपा- ताज प्रेसिडेन्सी, कुलाबा
शिवसेना- ताज लँड्स एंड, वांद्रे
शिवसेना (UBT)- ITC ग्रँड मराठा, परळ
NCP (अजित पवार)- हॉटेल ललित, अंधेरी विमानतळ

काय आहे विधानपरिषद निवडणुकीचं गणित?

महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे संख्याबळ 274 आहे. विधानसभेचे एकूण संख्याबळ हे 288 आहे. सध्याचं संख्याबळ लक्षात घेता विधानपरिषदेची एक जागा जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 23 मतांची आवश्यकता आहे. विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे 5, शिवसेना (शिंदे गट) 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 2 उमेदवार रिंगणात आहेत. म्हणजे महायुतीचे एकूण 9 उमेदवार हे रिंगणात आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने आपले 3 उमेदवार या निवडणुकीत उतरवले आहेत.

महाविकास आघाडीमधील शिवसेना (UBT)ने 1 उमेदवार दिला आहे. तर काँग्रेसनेही 1 उमेदवार दिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या पक्षाने भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला  आहे.

हे ही वाचा>> Pooja Khedkar: प्रचंड चर्चेत होती पुण्याची IAS पूजा खेडकर, तडकाफडकी वाशिमला बदली का?

कोणत्या पक्षाचे किती आमदार?

भाजप- 103
काँग्रेस- 37
शिवसेना (UBT)- 15
शिवसेना (शिंदे गट)- 38
राष्ट्रवादी (अजित पवार)- 40
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)- 12

छोट्या पक्षांचे किती आमदार आहेत?

बहुजन विकास आघाडी- 3
समाजवादी पक्ष- 2
एमआयएम-2
प्रहार जनशक्ती पक्ष-2
मनसे-1
पीझंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया- 1
नॅशनल सोसायटी पार्टी- 1
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)- 1
क्रांतिकारी शेतकरी पक्ष- 1
जन सुराज्य शक्ती- 1
अपक्ष- 13

विविध पक्षांकडून विधान परिषद निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे

भाजपचे 5 विधानपरिषद उमेदवार

1. पंकजा मुंडे
2. परिणय फुके
3. सदाभाऊ खोत
4. अमित गोरखे
5. योगेश टिळेकर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)

1. शिवाजीराव गर्जे
2. राजेश विटेकर

शिवसेना (शिंदे गट)

1. कृपाल तुमाने
2. भावना गवळी

शिवसेना (UBT)

1. मिलिंद नार्वेकर

काँग्रेस

1. प्रज्ञा सातव

शेकाप - राष्ट्रवादीचे शरद पवार समर्थक उमेदवार

1. जयंत पाटील

शिवसेनेने (UBT) मिलिंद नार्वेकर यांना विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी दिल्यामुळे विधानपरिषद निवडणुकीचे गणित बिघडलं आहे. निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 23 मतांची आवश्यकता आहे. अशावेळी शिवसेनेकडे (UBT) फक्त 15 आमदार आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) समर्थित उमेदवार जयंत पाटील यांनाही विजयासाठी अन्य पक्षांच्या आमदारांवर अवलंबून राहावे लागणार आहे. विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाले तर त्याचा सर्वाधिक फायदा उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) समर्थित उमेदवार जयंत पाटील यांना होईल.

    follow whatsapp